महाराष्ट्र

महाराष्ट्रातील चित्रपटगृहे सुरु करण्यासाठी ठाकरे सरकार सकारात्मक

सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी दिले संकेत

महाराष्ट्रातील चित्रपटगृहे सुरु करण्यासाठी ठाकरे सरकार सकारात्मक

सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी दिले संकेत

बारामती वार्तापत्र रिपोर्ट

महाराष्ट्रातील चित्रपटगृहे सुरु करण्यासाठी ठाकरे सरकार सकारात्मक आहे. केंद्रीय गृहमंत्रालायने अनलॉक ५ अंतर्गत गाइडलाइन्स लागू केल्या आहेत. त्यामध्ये १५ ऑक्टोबरपासून सिनेमा हॉल्स, चित्रपटगृहे उघडण्यास संमती देण्यात आली आहे. यासंदर्भात ठाकरे सरकार गांभीर्याने विचार करत आहे. सरकार यासंबंधीच्या निर्णयासाठी सकारात्मक आहे असं सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी म्हटलं आहे. “सिनेमागृहं सुरु करण्याबाबत केंद्र सरकारने आज निर्णय घेतला असून नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र सरकार गांभीर्याने विचार करतं आहे.

नवरात्र, दसरा, दिवाळी हा चित्रपट, नाटकांसाठी मौसम असतो. त्यामुळे चित्रपटगृहं सुरु करण्याची संमती द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे. यासंदर्भात सरकार सकारात्मक असून लवकच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत.” “महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. त्यामुळी शिथीलता देण्याआधी विचार केला जाईल मगच निर्णय घेतला जाईल. गेल्या सहा महिन्यांपासून सिनेसृष्टी, नाट्यसृष्टी अडचणीत आहे. त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळलं आहे. त्यामुळे त्यांना त्यातून बाहेर काढणं आणि या समस्येतून मार्ग काढू. लवकरच यासंदर्भातलं चित्र स्पष्ट होईल” असंही अमित देशमुख यांनी म्हटलं आहे.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउनपासून बंद करण्यात आलेली चित्रपटगृहे आता लवकरच सुरु होणार आहेत. केंद्र सरकारतर्फे सुरु करण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाद्वारे नियमावली लागू करण्यात आली आहे.

चित्रपटगृहं सुरु करण्यासंबंधीची नियमावली

चित्रपटगृहात केवळ ५० टक्के प्रेक्षकांची उपस्थिती बंधनकारक
चित्रपट पाहताना आसनव्यवस्थेत फिजिकल डिस्टन्सिंग पाळणं बंधनकारक
आसनव्यवस्था राखीव ठेवता येणार नाही
प्रेक्षकांना हँडवॉश किंवा हँड सॅनिटायझर पुरवण्यात यावं
आरोग्य सेतूचा वापर करण्याचा सल्ला प्रेक्षकांना देण्यात यावा
थर्मल स्क्रिनिंग करणं आवश्यक, फक्त लक्षणं नसलेल्या व्यक्तींनाच चित्रपटगृहांमध्ये प्रवेश देण्यात यावा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!