महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त निमगाव केतकी या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सकाळपासून रक्तदान शिबिर,नेत्ररोग निदान शिबीर, समाजातील गरजू लोकांना किराणा मालाचे किट वाटप, व कोविड रुग्णांना अंडी व फळे वाटप करण्यात आले.

महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त निमगाव केतकी या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सकाळपासून रक्तदान शिबिर,नेत्ररोग निदान शिबीर, समाजातील गरजू लोकांना किराणा मालाचे किट वाटप, व कोविड रुग्णांना अंडी व फळे वाटप करण्यात आले.
निलेश भोंग ; बारामती वार्तापत्र
महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय आमदार नामदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व जलसंधारण महिला बाल विकास राज्यमंत्री असून त्यांना त्यांच्या कामाच्या आगळ्यावेगळ्या कार्यपद्धतीमुळे महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय आमदार म्हणून ओळखलं जातं.त्यांच्या 51व्या वाढदिवसानिमित्त इंदापूर तालुक्यामधील निमगाव केतकी येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून भरगच्च विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रहार जनशक्ती पक्षाचे इंदापूर तालुका अध्यक्ष संजय राऊत यांनी बोलताना सांगितले की .
सकाळपासून रक्तदान शिबिर,नेत्ररोग निदान शिबीर, समाजातील गरजू लोकांना किराणा मालाचे किट वाटप, व कोविड रुग्णांना अंडी व फळे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर प्रहार जनशक्ती पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून भव्य वृक्षारोपण कार्यक्रम ही हाती घेऊन वृक्ष रोपण करण्यात आले असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाकडून सांगण्यात आलेले आहे.
हा कार्यक्रम निमगाव केतकी येथील संत सावता माळी मंदिर पार पडला.
प्रहार जनशक्ती पक्ष इंदापूर तालुक्याच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अनंतराव काळे व जिल्हा संघटक नीरज कडू यांचा भव्य सत्कार करण्यात आला. इंदापूर अर्बन बँकेच्या चेअरमनपदी देवराज जाधव यांची नियुक्ती झाल्याबद्दल व विभीषण लोखंडे यांची बहुजन परिषदेच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल तसेच अजित जाधव साहेब व रासकर साहेब यांची पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचाही भव्य नागरी सत्कार करण्यात आला.