राजकीय

महाराष्ट्रात घडलं तेच अमेरिकेतही घडेल; जो बायडन यांच्या ‘सातारा स्टाईल’ भाषणावर रोहित पवारांचं वक्तव्य

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे

महाराष्ट्रात घडलं तेच अमेरिकेतही घडेल; जो बायडन यांच्या ‘सातारा स्टाईल’ भाषणावर रोहित पवारांचं वक्तव्य

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे

बारामती वार्तापत्र रिपोर्ट

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील (US Presidential Election 2020) डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी जो बायडेन यांचे फ्लोरिडातील भाषण सध्या सोशल मीडियावर चांगेलच चर्चेत आहे. फ्लोरिडात जो बायडन यांचे भाषण सुरु असताना पावसाला सुरूवात झाली. परंतु त्यांनी आपलं भाषण न थांबवता ते सुरूच ठेवले. यामुळे अनेकांना शरद पवार यांच्या साताऱ्यातील ऐतिहासिक सभेची आठवण झाली. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांनी ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Rohit Pawar on Joe biden rally in Florida)
जेव्हा सभेत जोरदार पाऊस येतो पण नेता आणि जनता तसूभरही विचलित होत नाही तेव्हा तो पाऊस जुन्याला वाहून लावण्यासाठी आणि नव्याला न्हाऊ घालण्यासाठी आलेला असतो, असंच म्हणावं लागेल.

२०१९ ला हे महाराष्ट्राने बघितलंय आणि आता अमेरिकेतही हाच अंदाज आहे, असे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीसाठी 3 नोव्हेंबरला मतदान होणार असून 4 नोव्हेंबरला अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष निवडला जाईल. त्यामुळे अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षातील त्यांचे प्रतिस्पर्धी जो बायडेन प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात संपूर्ण ताकद पणाला लावताना दिसत आहेत.
डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन या दोन्ही नेत्यांनी नुकत्याच फ्लोरिडात सभा घेतल्या. यापैकी जो बायडेन यांची सभा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. फ्लोरिडात जो बायडन यांचे भाषण सुरु असताना पावसाला सुरूवात झाली. परंतु त्यांनी आपलं भाषण न थांबवता ते सुरूच ठेवले. या सभेनंतर जो बायडेन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला. ‘वादळ संपेल आणि नवीन दिवसाची सुरुवात होईल’, अशी कॅप्शन जो बायडेन यांनी फोटोखाली लिहली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!