महाराष्ट्रात पाणीच पाणी मात्र इंदापूरच्या झगडेवाडीत नागरिकांची पाण्यासाठी भटकंती
गावचा सरपंच इंदापूरला पाण्याचा घोर गावकऱ्यांना

महाराष्ट्रात पाणीच पाणी मात्र इंदापूरच्या झगडेवाडीत नागरिकांची पाण्यासाठी भटकंती
गावचा सरपंच इंदापूरला पाण्याचा घोर गावकऱ्यांना
इंदापूर : प्रतिनिधी
सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने हाहाकार माजवलेला असून संपूर्ण गावच्या गावे पाण्याखाली गेलेली आहेत.मात्र इंदापूर तालुक्यातील मौजे झगडेवाडी येथे मात्र ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी मे महिन्याच्या अखेरी पासून अक्षरशः भटकंती होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
झगडेवाडी येथील नागरिकांना जवळपास मे महिन्याच्या अखेरीपासून पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः भटकंती करावी लागत असून पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.झगडेवाडी गावासाठी गोखळी तळ्यातील असणाऱ्या दोन विहिरींमधून पाणी होते.मात्र उन्हाळ्याच्या अंती तेथील पाणी आठल्याने नागरिकांना स्वतः पाच पाचशे रुपये देऊन पाणी विकत घ्यावे लागत आहे.गावकऱ्यांची अशी दयनीय अवस्था झालेली असताना गावची महिला सरपंच व तिचे पती मात्र इंदापूरात राहत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितल. सदरील पिण्याच्या पाण्यासाठी दुसरी काय उपाययोजना केली आहे याबाबत अधिकची माहिती घेतली असता समजले की,झगडेवाडी पासून अंदाजे एक दीड किलोमीटरवर असणाऱ्या पाझर तलावा लगत लाखो रुपयांचा खर्च करून पिण्याच्या पाण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत विहिर बनवली गेली आहे.त्यामध्ये पाणी देखील आहे,परंतु ग्रामस्थांचा घसा कोरडा पडलेला असताना त्या विहिरीतील पाणी लोकांचा पाण्याविना जीव गेल्यावर गावात आणले जाणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
याबाबत पायपीट करून पिण्याचे पाणी वाहणाऱ्या वयोवृद्ध रघुनाथ मोरे यांना यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले की, आम्हाला रोजच पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.गावच्या पाण्याप्रश्नी सरपंच यांना विचारले असता सरपंच यांचे पती म्हणतात की, तळे आटले आहे, त्यामुळे पाणी मिळणार नाही अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन गावातील लोकांना दिशाभूल करणाऱ्या व गावचा पाण्याचा प्रश्न न सोडवता येणाऱ्या राष्ट्रवादीच्या सरपंच असणाऱ्या महिलेच्या पतीला राज्यमंत्र्यांनी तालुक्याचा कार्याध्यक्ष का बनवला असेल हा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
यासंदर्भात झगडे यांना विचारले असता ते म्हणाले की, झगडेवाडी गावासाठी असणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत आटल्याने गेले दोन-अडीच महीने पाणीपुरवठा होत नाही. जर पाण्याचा स्त्रोतच नसेल तर त्याला ग्रामपंचायत काय करेल ! शासनाकडे पाठपुरावा केला तरीदेखील शासनाने पाण्याच्या टँकर साठी परवानगी दिली नाही. गावच्या पाण्याचा प्रश्न असल्याकारणाने पेयजल योजनेअंतर्गत शासनाकडून योजना मंजूर करून आणली परंतु त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. काही तांत्रिक बाबींमुळे कनेक्शन व मोटर जोडणी राहिलेली आहे. अभंग वस्ती व झगडेवाडी पर्यंत पाईपलाईनचे काम पूर्ण झालेले असून लवकरच ती कार्यान्वित होईल.
उजनी धरणातून २२ गावच्या पाणी प्रश्नाबाबत आंदोलन करणाऱ्या त्या स्वयंघोषित नेत्याने आधी स्वतःच्या गावचा पाणी प्रश्न सोडवावा आणि नंतरच २२ गावच्या पाण्याप्रश्नी आंदोलने करावीत अशी दबक्या आवाजात गावातील ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.