महाराष्ट्रासह 5 राज्यात अवकाळी पावसाचे ढग,हवामान खात्यानं दिलेला इशारा
गेल्या काही दिवसांत देशभरात उन्हाचा तडाखा वाढला आहे.
महाराष्ट्रासह 5 राज्यात अवकाळी पावसाचे ढग,हवामान खात्यानं दिलेला इशारा
गेल्या काही दिवसांत देशभरात उन्हाचा तडाखा वाढला आहे.
मुंबई,प्रतिनिधी
एकीकडं राज्यात उन्हाची काहीली वाढत असतानाच, दुसरीकं काही जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.अरबी समुद्रामध्ये पूर्व मोसमी स्थिती निर्माण झाली आहे.
वर्तवलेल्या अंदाजानुसार कोल्हापूर आणि सातारा-सांगलीमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडायासह या भागांमध्ये अवकाळी पाऊस बरसल्याची माहिती समोर आली.
दक्षिण कोकणसह दक्षिण मध्य महाराष्ट्रातहा पावसाच्या हलक्या सरी बरसल्याची नोंद करण्यात आली. तिथे कोकणात अवकाळीनं धुमाकूळ घातलेला असतानाच विदर्भात मात्र उष्णतेची लाट आणि मारा करण्याचा इशाराही हवामान खात्यानं व्यक्त केला आहे.
सुदैवाची बाब म्हणजे या चक्रीवादळाचा भारतीय किनारपट्टीला कोणताही धोका नाही. मंगळवारी हे ‘असानी’ चक्रीवादळ बांगलादेश- उत्तर म्यानमारच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. एकीकडे भारतीय समुद्रात चक्रीवादळाची स्थिती तयार झाली असताना महाराष्ट्रात मात्र संमिश्र हवामान निर्माण झालं आहे. पुढील तीन दिवस विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर आज दक्षिण कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रात मात्र काही भागांत पाऊस आणि काही भागांत तीव्र उष्णचेची लाट दिसेल. थोडक्यात आज दिवसभरात कुठे बाहेर जाण्याआधी किंवा कोकणच्या दिशेनं जात असाल तरीही आधी हवामानाचा अंदाज घ्या आणि मगच पुढचा निर्णय.