क्राईम रिपोर्ट

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं अखेर पुण्यात एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या

स्वप्नीलनी स्थापत्य अभियांत्रिकेचे शिक्षण पूर्ण केले होते

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं अखेर पुण्यात एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या

स्वप्नीलनी स्थापत्य अभियांत्रिकेचे शिक्षण पूर्ण केले होते

पुणे : बारामती वार्तापत्र

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं अखेर पुण्यात एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केलीय. स्वप्नील लोणकर असं या तरुणाचं नाव आहे. तो अथक परिश्रम घेऊन एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला. पण उत्तीर्ण होऊन दीड वर्षे झाले तरी त्याला लोकसेवा आयोगाने नियुक्ती दिली नाही. अखेर नैराश्यातून त्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं पीडित तरुण स्वप्नील लोणकरने पुण्यातील फुरसंगी येथे आत्महत्या केली. ही घटना 29 जून रोजी घडली.

स्वप्नील हा घरी एकटाच होता. त्याची बहिण दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घरी आली. तेव्हा स्वप्निल तिला दिसला नाही. तीने स्वप्नीलच्या खोलीत जाऊन पहिले असता, स्वप्निनले गळफास घेतलेले आढळून आले. स्वप्नीलच्या बहिनेने याबाबत आई वडिलांना माहिती कळविली. आणि स्वप्निलला घेऊन तातडीने एका खाजगी रुग्णालयात घेऊन गेली. मात्र, डॉक्टरांनी उपचारापुर्वीच त्याचा मृत झाला असल्याचे घोषित केले.

दरम्यान, स्वप्नीलनी स्थापत्य अभियांत्रिकेचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षांची तयार करीत होता. राज्य लोकसेवा आयोगाची २०१९ मधील मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखत झाली नव्हती. तसेच २०२० मधील पूर्व परीक्षाही तो उत्तीर्ण झाला होता. मात्र, मुख्य परीक्षा होत नव्हती. नोकरीच्या विवंचनेतून त्याने आत्महत्येचा पर्याय स्वीकारला आहे. असे स्वप्नीलने आत्महत्या करण्यापूर्वी सूसाईड नोटमध्ये लिहिले आहे.

स्वप्नीलची आत्महत्या करण्यापूर्वीची सुसाईड नोट अशी..
येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत फक्त वय आणि ओझं वाढत जात आहे. दोन वर्ष झाले आहेत पास आऊट होऊन; आणि 24 वर्ष वय संपत आलंय. घरची एकंदरीत परिस्थिती, परीक्षा निघणाऱ्या आशेवर घेतलेलं कर्ज, खाजगी नोकरी करून कधीही फिटू न शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी, मी प्रत्येक वेळी व प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना..!
कोरोना नसता, सर्व परीक्षा सुरळीत झाल्या असत्या तर आज आयुष्य खूप वेगळं आणि चांगलं असतं हवं ते हवं तसं प्रत्येक साध्य झाला असतं. मी घाबरलो, खचलो असं मुळीच नाहीये.. मी कमी पडलो.. माझ्याकडे वेळ नव्हता.. नकरात्मकतेची ही वादळं कित्येक दिवस मनात होती. पण काहीतरी चांगलं होईल, या आशेवर तर धरला होता.. पण.. इथून पुढे आता आयुष्य कंटिन्यू होऊ शकेल असं काहीच उरलं नाहीये. कोणतीही व्यक्ती याला कारणीभूत नसून, हा माझा सर्वस्वी निर्णय आहे.. मला माफ करा शंभर जीव वाचवायचे होते मला डोनेशन करून 72 राहिले… स्वप्निल लोणकर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!