महालक्ष्मी उद्योग समूह संचलित धो.आ सातव कोविड सेंटरला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवारांकडून पंचवीस लाखांची मदत
बारामती व आजूबाजूच्या परिसरातील कोरोनाग्रस्त रुग्णांना या हॉस्पिटलचा मोठ्या प्रमाणात लाभ

महालक्ष्मी उद्योग समूह संचलित धो.आ सातव कोविड सेंटरला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवारांकडून पंचवीस लाखांची मदत
बारामती व आजूबाजूच्या परिसरातील कोरोनाग्रस्त रुग्णांना या हॉस्पिटलचा मोठ्या प्रमाणात लाभ
बारामती वार्तापत्र
कोरोना काळात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या सेवेसाठी बारामतीत सातव कुटुंबीय आणि डॉ.सुनिल पवार यांच्या सहकार्याने महालक्ष्मी उद्योग समुहा मार्फत सुरु करण्यात आलेल्या १०० बेड च्या कोविड हॉस्पिटलला आज देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी २५ लाखांची मदत केली आहे.गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात देखील कोरोनाने हाहाकार माजवला असताना या महाभंयकर संकटातून जनतेला सुखरूप बाहेर काढण्यासाठी अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहेत.बारामतीत सुरु असलेल्या या कोविड हॉस्पिटल मधून आतापर्यंत अनेक रुग्णांनी यशस्वी उपचार घेत कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
तर सदाशिव सातव यांनी मुंबई येथे शरद पवार यांची भेट घेतली, त्यावेळी पवार यांनी या उपक्रमाची माहिती घेतली होती. आज पवार यांनी सातव यांना बोलावून हा 25 लाखांचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला.
आजपर्यंत 300 रुग्णांवर या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहेत. बारामतीत कोरोनाची स्थिती गंभीर झालेली असताना ऑक्सिजनच्या बेडची कमतरता भासत होती, त्या वेळेस सातव कुटुंबियांनी व डॉ. पवार यांनी या हॉस्पिटलची उभारणी केली. येथे 30 ऑक्सिजनचे बेड उपलब्ध करुन दिले असून, डॉक्टर व नर्सिंग स्टाफ 24 तास उपलब्ध करुन देण्यात आला आहे. रुग्णवाहिकेचीही सुविधा देण्यात आली.
येथे दर्जेदार सुविधा, सुसज्ज आयसीयू व्यवस्था, वेळेवर औषध, सकस व दर्जेदार आहार, स्वच्छता, पिण्यासाठी आरओ सिस्टीमचे पाणी, बसण्यासाठी केलेली सुसज्ज व्यवस्था, मनोरंजनासाठी टिव्ही , सॅनिटायजर करणारे फॅन येथे बसविले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता माळेगाव कॉलनी येथील प्राथमिक शाळेत कोविड लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे.
त्यामुळे बारामती व आजूबाजूच्या परिसरातील कोरोनाग्रस्त रुग्णांना या हॉस्पिटलचा मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे.त्यामुळे या स्तुत्य उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी आज जेष्ठ नेते शरद पवारांनी बारामतीचे माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव यांच्याकडे पंचवीस लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त केला.यावेळी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब तावरे,गटनेते सचिन सातव,माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक नितीन सातव,नगरसेवक सुरज सातव उपस्थित होते.