तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील नूतन प्रशासकीय कार्यालयाचे उदघाटन संपन्न
महाविद्यालयात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील नूतन प्रशासकीय कार्यालयाचे उदघाटन संपन्न
महाविद्यालयात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
बारामती वार्तापत्र
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळाचे सदस्य डॉ.जयकुमार शहा यांचे हस्ते व संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर व सचिव मिलिंद शाह वाघोलीकर यांचे सन्माननीय उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सर्व सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश जगताप, एमबीए कॉलेजचे प्राचार्य डॉ.एम.ए.लाहोरी, कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.दर्शन शहा उपस्थित होते. यावेळी एनसीसीचे लेफ्टनंट डॉ.विवेक बळे यांच्या मार्गदर्शनाखाली संचलन झाले. एनसीसी च्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
यानंतर तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील प्रशासकीय कार्यालयाचे उदघाटन अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जवाहर शाह (वाघोलीकर) यांचे हस्ते करण्यात आले. तर या मुख्य कार्यालयातील प्राचार्य कार्यालयाचे उदघाटन संस्थेचे सचिव मिलिंद शाह (वाघोलीकर) यांचे शुभहस्ते व सभागृहाचे उदघाटन संस्थेचे सदस्य चंद्रगुप्त शाह (वाघोलीकर) यांचे शुभहस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे उपप्राचार्य डॉ.अशोक काळंगे यांचे कक्षाचे उदघाटन चंद्रवदन शहा (मुंबईकर), उपप्राचार्य कक्ष डॉ.सचिन गाडेकर यांचे कक्षाचे सदस्य सत्यजित शहा (पंदारकर), अभिनंदन शहा रजिस्ट्रार यांचे कक्षाचे उदघाटन सोनिक शहा (पंदारकर), व प्राचार्य स्वीय सहाय्यक सुषमा संगई यांचे कक्षाचे उदघाटन संस्थेचे सदस्य विद्युत शहा यांचे शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सर्व विश्वस्त, उपप्राचार्य, सर्व शाखेचे अधिष्ठाता, प्राध्यापक. शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ट्रायपॉड प्रणाली कार्यान्वित केली. त्याचप्रमाणे नवीन रस्ता देखील तयार केला. विविध विकास कामे महाविद्यालय करीत असून याचा फायदा महाविद्यालयातील सर्वच घटकांना होत आहे असे याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर यांनी सांगितले.