स्थानिक

महिलांनी चौफर वाचन करावे: सुषमा चव्हाण

महिला हा देशाचा आता आधारस्तंभ बनत चालल्या आहे

महिलांनी चौफर वाचन करावे: सुषमा चव्हाण

महिला हा देशाचा आता आधारस्तंभ बनत चालल्या आहे

बारामती वार्तापत्र 

मोबाईल कामा पुरता वापरा पण त्याचे व्यसन करू नका,कामाच्या वेळेनुसार पुस्तक, वर्तमानपत्र, मासिक आदी चे वाचन केल्याने सभोवताली चे ज्ञान वाढते त्यामुळे रोजच्या जीवनात व कामाच्या ठिकाणी त्या ज्ञानाचा फायदा होतो असे प्रतिपादन मानवबंध फाउंडेशनच्या अध्यक्षा सुषमा चव्हाण यांनी केले.

गुरुवार ३एप्रिल रोजी बारामती टेक्स्टाईल पार्क येथील पर्पल क्रिएशन येथील कंपनी मध्ये महिला कर्मचारी यांच्या साठी ‘महिला सबलीकरण’ या विषयावर मार्गदर्शन केले या प्रसंगी कंपनीचे संचालक दीपक तेजवणी,टेक्स्टाईल पार्क चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक वाघ ,फौंडेशन चे उपाध्यक्ष सदाशिव पाटील व विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्तीत होते.

कामाच्या ठिकाणी महिलांना अनेक प्रकारच्या छळवणुकीचा सामना करावा लागतो त्यासाठी त्यांनी स्वतः सक्षम होऊन विरोध करावा यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात आले .

महिलांसाठी संविधानाने जे कायदे निर्माण केले त्याचे त्यांना ज्ञान देण्यात आले महिला हा देशाचा आता आधारस्तंभ बनत चालल्या आहे कारण अनेक उद्योग क्षेत्रांमध्ये महिलांचा भरगोस सहभाग वाढत आहे त्यामुळे महिलांनी काम करताना कायद्याचे पण ज्ञान ठेवावे परंतु दुरुपयोग करू नये असा सल्ला सुषमा चव्हाण यांनी दिला.आभार मयूर शिंदे यांनी मानले

 

Related Articles

Back to top button