महिलादिन हा स्त्रीशक्ती आणि त्यांच्या कर्तृत्वाची प्रशंसा करण्याचा गौरवशाली दिवस-प्राचार्या अनिता साळवे
महामातांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून महिला दिन साजरा

महिलादिन हा स्त्रीशक्ती आणि त्यांच्या कर्तृत्वाची प्रशंसा करण्याचा गौरवशाली दिवस-प्राचार्या अनिता साळवे
महामातांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून महिला दिन साजरा
इंदापूर : प्रतिनिधी
मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या वतीने (दि.८) जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या प्राचार्या अनिता साळवे बोलत होत्या .त्या म्हणाल्या की,प्रत्येकाच्याच जीवनात असणाऱ्या महिलांच्या योगदानाला आणि स्रीत्वाला साजरा करण्याच्या अनुषंगाने महिला दिनाचे विशेष महत्व आहे.महिलादिन हा स्त्रीशक्ती आणि त्यांच्या कर्तृत्वाची प्रशंसा करण्याचा गौरवशाली दिवस असल्याने साजरा करण्यात येतो.
आपल्या घरापासून ते देशाच्या विकासामध्येही महिलांचे मोठे योगदान आहे.या दिवशी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने महिलांप्रती आदर व्यक्त करतात.असे प्राचार्या अनिता साळवे कार्यक्रमाप्रसंगी म्हणाल्या.यावेळी उपस्थित महिला कर्मचाऱ्यांच्या हस्ते बहुजन महामातांच्या प्रतिमेंना पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्राचार्यांच्या वतीने महिला कर्मचाऱ्यांचा येथोचीत सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमास उप प्राचार्या सविता गोफणे,प्रा. रेश्मा झेंडे, मनिषा जगताप- मखरे, अधीक्षक अनिसा मुल्ला, निता भिंगारदिवे- जगताप आदी महिला कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.