मागील पाच-सहा दिवसांपासून नव्या कोरोना रुग्णांची संख्या इंदापूर तालुक्यात झपाट्याने वाढत
मागील पाच-सहा दिवसांपासून नव्या कोरोना रुग्णांची संख्या इंदापूर तालुक्यात झपाट्याने वाढत

मागील पाच-सहा दिवसांपासून नव्या कोरोना रुग्णांची संख्या इंदापूर तालुक्यात झपाट्याने वाढत
रोज साधारणतः 50 हून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत.
बारामती वार्तापत्र
इंदापूर तालुक्यात मागील काही महिन्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात आला होता. या काळात तालुक्यात रोज 20 नवे कोरोना रुग्ण आढळत होते. मात्र मागील पाच-सहा दिवसांपासून नव्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. येथे रोज साधारणतः 50 हून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना रुग्णांची ही वाढ इंदापूर तसेच समस्त महाराष्ट्रासाठी चिंतेचे कारण बनत आहे.
नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या 50 पर्यंत गेली
मागील काही दिवसांपूर्वी इंदापूर तालुक्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात आला होता. येथे नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या 50 च्या खाली गेली होती. मात्र, आता कोरोना संसर्ग पुन्हा वाढू लागला असून चिंता वाढली आहे. येथे सध्या रोज नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या ही 50 पर्यंत गेली आहे. रुग्णसंख्या वाढल्यामुळे येथे आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. इंदापुरातील उपजिल्हा रुग्णालय काही दिवसांपूर्वी बंद होते. आता हेच रुग्णालाय कोविड सेंटर असून ते पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
इंदापूर तालुक्यात 356 सक्रिय कोरोना रुग्ण
इंदापूर तालुक्यात सध्या तीनशेच्या आसपास रोज कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. येथील आरोग्य विभागाने तशी माहिती दिली आहे. इंदापूरमध्ये जुलै महिन्यात तब्बल 1012 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. तर एकूण 13 जणांचा मृत्यू झाला. सध्या इंदापूर तालुक्यात 356 सक्रिय कोरोना रुग्ण असून आतापर्यंत 428 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसरी लाट येण्याची शक्यता आरोग्यतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. तिसऱ्या लाटेची शक्यता असताना इंदापुरात कोरोना रुग्ण वाढत आहेत. ही सर्व परिस्थिती पाहता येथील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, तसेच लसीकरणाला प्राधान्य द्यावे असा सल्ला साथरोगतज्ज्ञ देत आहेत.