महाराष्ट्र

माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन

जसवंत सिंह यांची राजकारण आणि समाजाबाबतच्या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण दृष्टीकोनासाठी कायम आठवण काढली जाईल. नरेंद्र मोदींप्रमाणेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही ट्विट करत जसवंत सिंह यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन.

नवी दिल्ली -बारामती वार्तापत्र

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते जसवंत सिंह यांचे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून ते कोमामध्ये होते. दरम्यान, जसवंत सिंह यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे.

भाजपाच्या संस्थापक नेत्यांपैकी एक असलेल्या जसवंत सिंह यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएस सरकारमध्ये विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली होती. १९९६ ते २००४ यादरम्यान त्यांनी संरक्षण, परराष्ट्र आणि वित्त मंत्राालय अशा मोठ्या खात्यांचे मंत्रिपद भूषवले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाली साडे आठच्या सुमारास ट्विट करून त्यांच्या निधनाची माहिती देत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

जसवंत सिंह यांची राजकारण आणि समाजाबाबतच्या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण दृष्टीकोनासाठी कायम आठवण काढली जाईल. नरेंद्र मोदींप्रमाणेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही ट्विट करत जसवंत सिंह यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात भाजपाच्या दिग्गज नेत्यांपैकी एक असलेल्या जसवंत सिंह यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात भारतीय लष्करामधून केली होती. त्यानंतर ते राजकारणात दाखल झाले होते. वाजयपेयी सरकारच्या काळा त्यांची कारकिर्दी शिखरावर होती. दरम्यान, जसवंत सिंह यांनी कारकिर्दीत अनेक चढ-उतार पाहिले. त्यांनी अने वादविवादांचा सामनाही केला. विशेषकरून १९९९ मध्ये कंधार विमान अपहरणावेळी प्रवाशांची मुक्तता करण्यासाठी दहशतवाद्याला घेऊन कंधारला गेल्याने त्यांच्यावर टीका झाली होती. .
मात्र वाजपेयी सरकारमधील त्यांचं महत्त्व कायम राहिलं. पुढे एनडीएचं सरकार गेल्यानंतर जसवंत सिंह यांनी २००९ पर्यंत राज्यसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिलं. तसेच गोरखालँडची मागणी करणाऱ्या दार्जिंलिंगमधील स्थानिक पक्षांच्या पाठिंब्यावर ते लोकसभेवर निवडून गेले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!