माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सत्र न्यायालयाने दिलेल्या न्यायलयीन कोठडीला ईडीने उच्च न्यायालयात आव्हान
ED ने सेशन्स कोर्टाची कालच्या ऑर्डरला चॅलेंज केलं आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सत्र न्यायालयाने दिलेल्या न्यायलयीन कोठडीला ईडीने उच्च न्यायालयात आव्हान
ED ने सेशन्स कोर्टाची कालच्या ऑर्डरला चॅलेंज केलं आहे.
प्रतिनिधी
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सत्र न्यायालयाने दिलेल्या न्यायलयीन कोठडीला ईडीने उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. ED ने सेशन्स कोर्टाची कालच्या ऑर्डरला चॅलेंज केलं आहे. ईडीच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात न्यायमूर्ती माधव जमादार यांच्या बेंच पुढे सुनावणी होणार आहे. यानिमित्तानं अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
अनिल देशमुख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मनी लॉन्ड्रिंगप्रकणी 6 नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीची मुदत शनिवारी संपत असल्यानं त्यांना काल कोर्टात हजर केलं असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अनिल देशमुख यांना ईडी कोठडी द्यावी, अशी अंमलबजावणी संचलनालयाची मागणी होती. मात्र, सत्र न्यायालयानं ईडीला धक्का देत अनिल देशमुख यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. ईडीनं आता सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेतली असून नेमकं काय घडणार हे पाहावं लागणार आहे.