माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा ताबा आता सीबीआयकडे; तर याचिकेवरील सुनावणीस न्यायाधीशांचा नकार
कालच जे.जे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा ताबा आता सीबीआयकडे; तर याचिकेवरील सुनावणीस न्यायाधीशांचा नकार
कालच जे.जे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मुंबई – प्रतिनिधी
भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आर्थर रोड तुरुंगात असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आणखी एक झटका बसला आहे. सीबीआय ने देशमुखांना आर्थर रोड जेलमधून ताब्यात घेतले आहे. 100 कोटी वसुली प्रकरणी चौकशीसाठी सीबीआयने देशमुखांना ताब्यात घेतले आहे.तसंच, देशमुखांची सीबीआय कोठडी मिळवण्यासाठी त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे.
न्यायमूर्ती रेवती मोहिती डेरे यांनी ही याचिका दुसऱ्या एकलपीठाकडे सादर करण्याचे निर्देश दिल्यामुळे देशमुखांचे वकील दुपारी पुन्हा न्यायामूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी याचिका ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे.
‘ईडी’कडून पैशांच्या गैरव्यवहाराचा तपास सुरू असतानाच सीबीआयला मूळ १०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीच्या आरोपाचा तपास करायचा आहे. यासाठी सीबीआयला अनिल देशमुख यांचा ताबा हवा होता. विशेष पीएमएलए न्यायालयाने सीबीआयला तशी परवानगी दिली होती. त्यानुसार आज सीबीआयने अनिल देशमुख यांचा अधिकृतपणे ताबा घेतला आहे.
11 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी – सीबीआय अधिकारी अनिल देशमुख यांना ताब्यात घेण्यात अगोदरच शुक्रवारी बाथरूम मध्ये पाय घसरून पडल्याने तीन दिवस जे जे रुग्णालयात भरती करण्यात आले होते. आज त्यांना जे जे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. अनिल देशमुख यांच्या रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या प्रकरणावर देखील सीबीआय वकिलांनी आक्षेप घेतला होता. या प्रकरणातील आरोपी सचिन वाझे, कुंदन शिंदे, संजीव पालांडे यांना सीबीआयने 4 एप्रिल रोजी अटक करून ताबा घेतला आहे. तसेच न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांना 11 एप्रिल पर्यंत सीबीआय कोठडीत पाठवण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. त्यावेळी अनिल देशमुख यांच्या संदर्भात जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावरून सीबीआय वकिलांकडून संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र आता अनिल देशमुख यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर सीबीआय उद्या त्यांचा अर्थर रोड जेलमधून ताबा घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.