माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे वयाच्या 94 वर्षी वृद्धापकाळाने दुःख निधन

माजी मंत्री शंकरारराव कोल्हे यांनी 1960 मध्ये सहकाराच्या माध्यमातून कोपरगाव येथे संजीवनी सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली आणि तेथूनच खऱ्या अर्थाने या शेतकऱ्याला समृद्ध करण्याचा वसा त्यांनी घेतला.

माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे वयाच्या 94 वर्षी वृद्धापकाळाने दुःख निधन

माजी मंत्री शंकरारराव कोल्हे यांनी 1960 मध्ये सहकाराच्या माध्यमातून कोपरगाव येथे संजीवनी सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली आणि तेथूनच खऱ्या अर्थाने या शेतकऱ्याला समृद्ध करण्याचा वसा त्यांनी घेतला.

प्रतिनिधी

माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे वयाच्या 94 वर्षी आज पहाटे वृद्धापकाळाने दुःख निधन झाले आहे. त्यांचा अंत्यवविधी आज सायंकाळी 4.30 वाजता कोपरगाव येथील संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेज येथे होणार आहे.

कोल्हे यांचा जन्म कोपरगाव तालुक्यातील येसगाव सारख्या छोट्याशा खेडेगावात झाला. ग्रामीण जीवनाचा बाज अंगी बाळगत त्यांनी धाडसाने सर्वच क्षेत्रात काम केले. कोल्हे यांनी दीर्घकाळ कोपरगावचे (जि. अहमदनगर) प्रतिनिधीत्व केले. कोपरगावचे सरपंच ते त्याच तालुक्याचे सहावेळा आमदार असा विलक्षण प्रवास त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) सुरुवातीच्या काळापासून काम केले. कोल्हे यांचे सहकारातील योगदान अतिशय मोठे आहे. 1960 मध्ये त्यांनी संजीवनी सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. त्यानंतर अनेक सहकारी संस्था उभ्या केल्या आणि सक्षमपणे चालविल्या.

सरपंच ते मंत्री

येसगावचे सरपंच ते मंत्री आणि इतरही अनेक महत्वाच्या संस्थांचे पदाधिकारी म्हणून त्यांनी मजल मारली. त्यांच्या कार्यामुळे त्यांचा विविध पुरस्काराने सन्मान देखील करण्यात आला. त्यांच्या निधनाने सहकार, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील मोठी हानी झाली आहे. त्यांच्या निधनाने कोल्हे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, मी व माझे कुटुंबीय कोल्हे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत, असे मंत्री छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

कोपरगावचे सरपंच ते त्याच तालुक्याचे सहावेळा आमदार असा विलक्षण प्रवास त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरुवातीच्या काळापासून काम केले. कोल्हे यांचे सहकारातील योगदान अतिशय मोठे आहे. 1960 मध्ये त्यांनी संजीवनी सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. त्यानंतर अनेक सहकारी संस्था उभ्या केल्या आणि सक्षमपणे चालविल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram