माजी विद्यार्थ्यांची 20 वर्षांनी पुन्हा भरली शाळा ; 2004 मधील विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा
150 पैकी 65 विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित..

माजी विद्यार्थ्यांची 20 वर्षांनी पुन्हा भरली शाळा ; 2004 मधील विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा
150 पैकी 65 विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित..
इंदापूर प्रतिनिधी –
वीस वर्षांपूर्वी एकत्र शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा शाळा भरली. 35 शी ओलांडलेल्या विद्यार्थ्यांनी त्याकाळी बाकांवरच्या मित्र-मैत्रिणी सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. निमित्त होते इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील श्री पळसनाथ हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे.
पळसदेव (ता.इंदापूर) येथील श्री पळसनाथ हायस्कूलमध्ये 2003-2004 साली शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे रौप्यमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच इंदापूर तालुक्यातील पळसदेव या ठिकाणी पार पडले. या स्नेहसंमेलनात 150 पैकी 65 विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाला नवनाथ अवचर, लक्ष्मण कोकरे,अर्जुन निकम,ढेरे सर,कालिदास गोडगे,संजय जाधव,मच्छिंद्र बडे, एच. एम. काळे,गोरख बांडे, एमपुरे सर,शिपाई माने आदी उपस्थित होते. वरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून देताना शाळेतल्या गमतीजमती सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच समाजात वावरताना एकमेकांना आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली.
शाळेतील सवंगडी, शाळेचा वर्ग, लाकडी बाक यांची आठवण प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर घर करून असते. शाळा सोडल्यावर पुन्हा लाकडी बाकांवर बसण्याची इच्छा अनेकांच्या मनात वारंवार येतेच. म्हणूनच अशा स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात यावी अशी अपेक्षा यावेळी अनेकांनी व्यक्त केली. यावेळी विद्यार्थ्यांशी उपस्थित शिक्षकांनी संवाद साधला. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मित्र मैत्रिणींचा फेटा बांधून स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अतुल माळवदकर,अक्षय होरणे,संदीप शेलार,किशोर डोंगरे,सोमनाथ काळे,किरण काळे,सूरज डोईफोडे,पुरुषोत्तम चव्हाण,सुभाष बनसोडे,सुजित मोरे,विकास भोसले यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर डोंगरे,दीपिका भिसे यांनी केले सूत्रसंचालन वृषाली कासार,अश्विनी बडे यांनी केले तर आभार आकाश कांबळे यांनी मानले.