माझा वाढदिवस साजरा न करता गरजू लोकांना व गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करा;आमदार यशवंत माने यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
जागतिक कोरोना महामारीच्या संकटामुळे घेतला निर्णय.
माझा वाढदिवस साजरा न करता गरजू लोकांना व गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करा;आमदार यशवंत माने यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
जागतिक कोरोना महामारीच्या संकटामुळे घेतला निर्णय.
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
दि.१० नोव्हेंबर रोजी मोहोळ विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार यशवंत माने यांचा जन्मदिवस असून यावर्षी कोरोना संसर्गजन्य जागतिक महामारी चा आपण सर्वजण सामना करीत आहोत तरी या परिस्थितीत मी वाढदिवस साजरा करणे योग्य नाही. या कोरोना काळात अनेकांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे.अशावेळी आपण सर्वांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या परिसरातील गरजू लोकांना व गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी होईल तेवढी मदत करता येईल ती करून माझा वाढदिवस साजरा केला तर त्याचे मला निश्चितच समाधान वाटेल अशा प्रकारचे आवाहन आमदार यशवंत माने यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.