माझी वसुंधरा अभियानांतर्गत टेक्निकल विद्यालयात टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूचे प्रदर्शन संपन्न
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विकास जाधव यांनी केले.
माझी वसुंधरा अभियानांतर्गत टेक्निकल विद्यालयात टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूचे प्रदर्शन संपन्न
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विकास जाधव यांनी केले.
बारामती वार्तापत्र
बारामती येथील राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालयात बारामती नगरपरिषद व टेक्निकल विद्यालय यांच्या सौजन्याने स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा अभियान -2 अंतर्गत विज्ञान साहित्य प्रदर्शन व प्लॅस्टिक च्या टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
या प्रदर्शनात इ 5 वी ते 12 वी पर्यंतच्या अनेक विद्यार्थानी विविध उपकरणे तयार करत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.या साहित्यामध्ये ऊर्जासवर्धन,जलसंवर्धन, प्लॅस्टिक पुनर्वापर, स्वछता या विषयावर आधारित अनेक उपकरणे तयार केली होती.
या प्रदर्शनाचे उद्घाटन बारामती नगरपरिषदचे प्रशासकीय अधिकारी कु.स्नेहल घाडगे,श्री संतोष तोडकर,करनिरीक्षक श्री सचिन खोरे,लेखाधिकारी श्री बाळासाहेब दुधभाते, सहाय्यक लेखाधिकारी श्री नानासाहेब शितोळे,समन्वयक श्री वणवे सर, विद्यालयाचे प्राचार्य श्री झाकीर शेख,पर्यवेक्षक श्री रमेश जाधव,यांनी केले.
या कार्यक्रमासाठी विद्यालयातील जेष्ठ शिक्षक श्री महादेव शेलार,विज्ञान शिक्षिका सौ स्मिता काळभोर,सौ.नाझणीन शेख,श्री सावता म्हस्के,श्री मोहन ओमासे, कलाशिक्षिका सौ रुपाली तावरे,श्रीमती सुजाता गाडेकर उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विकास जाधव यांनी केले.