माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत इंदापूर नगरपरिषदेकडून हजारो झाडांचे वृक्षारोपण
कर्मचाऱ्यांनी वृक्षसंवर्धन जोपासण्याची घेतली शपथ
माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत इंदापूर नगरपरिषदेकडून हजारो झाडांचे वृक्षारोपण
कर्मचाऱ्यांनी वृक्षसंवर्धन जोपासण्याची घेतली शपथ
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक २ ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत ‘माझी वसुंधरा अभियान ‘ राबवण्यात येत असून या योजनेअंतर्गत इंदापूर नगरपरिषदेकडून आज दि.२३ रोजी इंदापूर मंडल अधिकारी कार्यालयाच्या पाठीमाघील परिसरात नगराध्यक्षा अंकिता शहा, मुख्याधिकारी डॉ.प्रदिप ठेंगल, तसेच मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करुन पर्यावरणपूरक अभियानाची सुरुवात केली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना नगराध्यक्षा अंकिता शहा म्हणाल्या की,स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पर्यावरण संतुलन व रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियान हाती घेण्यात आले असून पृथ्वी,वायू,जल,अग्नी,आकाश या पंचतत्त्वावर आधारित वनीकरण,वनसंवर्धन,घनकचरा,सांडपाणी व्यवस्थापन,जमिनीची धुप थांबवणे, प्रदूषण कमी करणे,हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे, नदीसंवर्धन,सागरी जैवविविधता,जलस्त्रोतांचे संवर्धन व संरक्षण,सागरी किनार्याची स्वच्छता करणे,उर्जेचा परिणामकारक वापर करणे,तिचा अपव्यय टाळणे तसेच अपारंपरिक उर्जेच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत असून हे अभियान राबवण्याच्या दृष्टीने शहरात ज्या ठिकाणी जागा उपलब्ध असेल अशा ठिकाणी देशी झाडे लावण्यात येणार असून शहरवासीयांनी घराच्या आजूबाजूच्या परिसरात व कुंडीत रोपे लावून शहर हरित करण्यासाठीच्या अभियानात हातभार लावावा असे आवाहन नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी केले.
यावेळी उपस्थित नागरिक व कर्मचाऱ्यांनी वृक्षसंवर्धन जोपासण्याची शपथ घेतली. वृक्षारोपणासाठी कचरा डेपोवर तयार झालेले खत आणि मातीचा वापर करुन या ठिकाणी विविध प्रकारच्या देशी आणि आणि फुलांच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.
भरत शहा मित्र परिवाराने वृक्षारोपणासाठी रोपे देवून निसर्ग संवर्धन समाजहिताचे कार्य केले.
यावेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा,सहाय्यक आरोग्य निरीक्षक लिलाचंद पोळ,अशोक चिंचकर,बांधकाम विभागाचे विलास चव्हाण,मुकादम दत्तू ढावरे, बापू मखरे व इतर कर्मचारी
उपस्थित होते.