कोरोंना विशेष
माझे कुटुंब, माझी जबाबदारी चा बारामतीकरांना उपयोग होतोय… या अॅक्टिव्ह सर्व्हे मध्ये मिळाले १८ जण कोरोनाबाधीत…
त्यामुळे उर्वरित भागातही शुक्रवारी ही मोहिम राबवली जाणार आहे.
माझे कुटुंब, माझी जबाबदारी* चा बारामतीकरांना उपयोग होतोय… या अॅक्टिव्ह सर्व्हे मध्ये मिळाले १८ जण कोरोनाबाधीत…
त्यामुळे उर्वरित भागातही शुक्रवारी ही मोहिम राबवली जाणार आहे.
बारामती:वार्तापत्र
बारामती शहरात आज ३२ हजार लोकांचा सर्वे झाला, त्यामध्ये ९७ संशयितांपैकी १८ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. परवापर्यंत तीन जणांच्या चाचणीमागे एक जण आढळत होता, त्याचा विचार करता, बारामतीला दिलासा मिळाला आहे,.
बारामती तालुक्यातील गुनवडी, पणदरे व माळेगाव या तीन गावांमध्ये अॅक्टीव्ह सर्वे झाल्यानंतर आज बारामती शहरात ८ हजार २३३ कुटुंबाचे एका दिवसात सर्वेक्षण झाले. त्यामध्ये ९७ संशयितांपैकी १८ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे उर्वरित भागातही शुक्रवारी ही मोहिम राबवली जाणार आहे.