माणकोबावाडा येथील श्री सिध्दनाथ जोगेश्वरी देवाची यात्रा रद्द
कोविड 19 या संसर्गजन्य आजाराच्या प्रसारामुळे सुरक्षा म्हणुन यात्रा रद्द करण्यात आली.
माणकोबावाडा येथील श्री सिध्दनाथ जोगेश्वरी देवाची यात्रा रद्द
कोविड 19 या संसर्गजन्य आजाराच्या प्रसारामुळे सुरक्षा म्हणुन यात्रा रद्द करण्यात आली.
यवत;बारामती वार्तापत्र
दौंड तालुक्यातील माणकोबावाडा येथील श्री सिध्दनाथ जोगेश्वरी देवाची यात्रा कोविड 19 या संसर्गजन्य आजाराच्या प्रसारामुळे देवस्थान मानकरी यांनी नियोजन करून दि. २७ व २८ रोजी भरणारी यात्रा रद्द करण्यात आलेली आहे.
या यात्रेला दरवर्षी हजारो भावीक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन हजेरी लावत असतात. परंतु यावर्षी सर्वत्र कोरोना महामारी संकट असल्यामुळे या संसर्गजन्य आजाराचा धोका उद्भवू नये यासाठी सुरक्षा म्हणुन मंदिर व्यवस्थापन व मानकरी यांनी एकत्र येऊन पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन यात्रा रद्द असल्याचे जाहीर केले.
त्याचप्रमाणे देवाचे पारंपारिक कार्यक्रम, छबिना, पूजाविधी, स्थानिक मानकऱ्यांच्या उपस्थित साजरे केले जातील.