मातंग ऐक्यासाठी स्वाभिमानी मातंग ऐक्य परिषदेची स्थापना इंदापूर या ठिकाणी करण्यात आली
राज्यात एक विचार, एक झेंडा व एक समाज प्रतिक,एक स्वाभिमानी अभिवादन पध्दतीचा आवाज निर्माण व्हावा .
मातंग ऐक्यासाठी स्वाभिमानी मातंग ऐक्य परिषदेची स्थापना इंदापूर या ठिकाणी करण्यात आली
राज्यात एक विचार, एक झेंडा व एक समाज प्रतिक,एक स्वाभिमानी अभिवादन पध्दतीचा आवाज निर्माण व्हावा .
निमगाव केतकी ; प्रतिनिधी
राज्यातील मातंग समाजामध्ये परिवर्तनाचे काम करणा-या अनेक संघटना आहेत मात्र मातंग समाजाला सामाजिक दर्जाअद्याप प्राप्त झाला नाही. मागासलेपणा कमी करून समाजाला सामाजिकदृष्ट्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करावे लागणार आहे. त्यासाठी मातंगाचे ऐक्य करणे काळाची गरज आहे.
मातंग ऐक्यासाठी स्वाभिमानी मातंग ऐक्य परिषदेची स्थापना करण्यात यावी.असा ठराव मातंग समाज चिंतन बैठकीत एक मुखाने पारीत झाला. इंदापूर येथील विश्रामगृहात आज दि.७नोव्हेंबर रोजी मातंग समाजावरील अन्याय, अत्याचार थांबविण्यासाठी तसेच मातंग समाजामध्ये जागृती व रचनात्मक काम करणेसाठी मातंग समाजाला प्रवाहात आणण्याचे काम करावे लागणार आहे. त्यासाठी मातंगाचे ऐक्य करणे काळाची गरज आहे.
मातंग ऐक्यासाठी स्वाभिमानी मातंग ऐक्य परिषदेची स्थापना करण्यात यावी.असा ठराव मातंग समाज चिंतन बैठकीत एक मुखाने पारीत झाला. इंदापूर येथील विश्रामगृहात आज दि.७नोव्हेंबर रोजी मातंग समाजावरील अन्याय, अत्याचार थांबविण्यासाठी तसेच मातंग समाजामध्ये जागृती व रचनात्मक काम करणेसाठी मातंग समाज चितंन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मातंग समाजाचे जेष्ठ ॲड.नारायण ढावरे, बहुजन परिषदेचे बिभिषण लोखंडे, प्रकाश आरडे ,शिक्षक व बैठकीचे आयोजक संतोष मोहिते, बाभुळगावचे अप्पा मिसाळ,संपादक भगवान मोरे सर,शिवशाही शेतकरी संघटनेचे नेते नितीन आरडे-पाटील,बामसेफचे रोहित ढावरे, निमगाव केतकी चे दतात्रय बिजू मिसाळ ,प्रा.शिवाजी शिंदेपत्रकार आदी मातंग समाजाच्या प्रमुख पदाधिका-याच्या उपस्थितीत बैठक पार पडली. मातंग समाजात ऐकी निर्माण करणे हे जिकरीचे काम असले तरी अशक्य नाही.
मातंग समाजाचे प्रश्न मातंग समाजाच्या विचारपिठावर मांडून त्याची सोडवणूक करणे आवश्यक आहे. लोकशाही प्रक्रियेत मातंग समाजाचा सामाजिक दबाव गट निर्माण झाला पाहीजे.मातंग समाज सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेत अत्यंत मागास राहीलेला आहे.समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न म्हणावे त्या पध्दतीने झाले नाहीत.
राज्यात एक विचार, एक झेंडा व एक समाज प्रतिक,एक स्वाभिमानी अभिवादन पध्दतीचा आवाज निर्माण व्हावा .त्यासाठी स्वाभिमानी मातंग परिषदेच्या माध्यमातून सर्व मातंग व्यक्ती,संघटना ,संस्था यांना एका वैचारीक पातळीवर आणणे हि काळाची गरज आहे. ज्यांना या स्वाभिमानी मातंग ऐक्य परिषदे मध्ये काम करायची इच्छा आहे त्यांनी सहभागी व्हावे. असे अहवान परिषदेचे आयोजक संतोष मोहीते ,ॲड.नारायण ढावरे यांनी केले आहे. मातंग समाजाचे क्रांतीकारक अद्यगुरू लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त दि. १४ नोव्हेंबर रोजी मातंग समाजाची दुसरी चिंतन बैठक वालचंदनगर येथे होणार आहे. सदर बैठकीस मातंग समाज बांधवांनी उपस्थितीत रहावे असे आव्हान अप्पा मिसाळ व बिभिषण लोखंडे यांनी केले आहे.