माळी सेवा संघ इंदापूर तालुका कार्याध्यक्षपदी विजय शिंदे यांची निवड.
सामाजिक कार्याची आवड व तालुक्यातील असणारा संपर्क पाहता झाली निवड.
माळी सेवा संघ इंदापूर तालुका कार्याध्यक्षपदी विजय शिंदे यांची निवड.
सामाजिक कार्याची आवड व तालुक्यातील असणारा संपर्क पाहता झाली निवड.
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
इंदापूर येथील सामाजिक कार्यकर्ते विजय शिंदे यांची माळी सेवा संघाच्या इंदापूर तालुका कार्याध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली.
माळी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय माळी व युवा आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश राऊत यांनी विजय शिंदे यांना नियुक्तीचे पत्र दिले.
सामाजिक क्षेत्रातील आवड तसेच माळी समाजाच्या सेवेबद्दलची ओढ लक्षात घेऊन शिंदे यांची समाजकार्यासाठी व समाज संघटन मजबूत करण्यासाठी माळी सेवा संघाच्या इंदापूर तालुका कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असल्याचे नियुक्ती पत्रात नमुद करण्यात आले आहे.
या निवडीबद्दल सर्व स्तरातून विजय शिंदे यांचे अभिनंदन होत आहे. तालुका कार्याध्यक्ष पदावर निवड झाल्याने खूप मोठी जबाबदारी वाढली असून समाजाचे संघटन करण्यासाठी तसेच समाजबांधवांच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी माळी सेवा संघाच्या माध्यमातून कायम प्रयत्नशील राहणार असल्याचे
निवडीनंतर विजय शिंदे यांनी सांगितले आहे.