माळेगावाच्या सभासदांना दिवाळीसाठी १५० रुपये प्रतिटन जाहीर.
कोरोनाच्य या संकट काळात देखील माळेगाव साखर कारखान्याच्या सभासदांना मिळालेले पैसे काहीसा दिलासा देणारे ठरतील.
माळेगावाच्या सभासदांना दिवाळीसाठी १५० रुपये प्रतिटन जाहीर..
कोरोनाच्य या संकट काळात देखील माळेगाव साखर कारखान्याच्या सभासदांना मिळालेले पैसे काहीसा दिलासा देणारे ठरतील.
बारामती वार्तापत्र
माळेगाव सहकारी साखर कारखान्याने सभासदांना दिवाळीसाठी १५० रुपये प्रतिटनजाहीर केले.सोमवार दी.०२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी सांगितले.यामध्ये खोडवा अनुदानाचे ५० रुपये,सभासद ठेविचे ५० रुपये आणि मागील गाळप हंगामात तुटून आलेल्या उसाच्या पोटी ५० रुपये असे एकूण १५० रुपये प्रतिटन सभासदांना देण्याचे बैठकीत ठरले असल्याचे तावरे यांनी नमूद केले. माळे गाव सहकारी साखर कारखाना राज्यात अग्रगण्य कारखाना म्हणून ओळखला जातो. गाळप हंगाम सन २०१९- २० यामध्ये गाळप झालेल्या उसाच्या एफ आर पी ची रक्कम २६९३ होती मात्र कारखान्याने आजपर्यंत २७०० रुपये प्रतिटन ऊस उत्पादक सभासदांना दिले आहेत,आता जाहीर केलेल्या ५० रुपये प्रतिटन मुळे मागील गाळप हंगामात तुटून आलेल्या उसाच्या एफ आर पी पेक्षा कारखान्याने एकूण ५७ रुपये प्रतिटन अधिकचे दिले आहेत,तसेच मागील खोडवा अनुदानाच्या पोटी ५० रुपये प्रतिटन आणि सभासदाच्या ठेविमधील ५० रुपये प्रतिटन अशाप्रकारे या दिवाळीसाठी सभासदांना पैसे मिळणार आहेत. यासाठी कारखाना प्रशासनाने साधारणपणे १० ते १२ कोटींची तरतूद केली असल्याचे तावरे यांनी नमूद केले.दरम्यान राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी एफ आर पी ची रक्कम अद्याप दिली नसल्याचे चित्र आहे.दरम्यान माळेगाव कारखान्याचे विस्तारितकारण झाले असून ४००० मे.टन प्रतिदिन गाळप असलेला कारखाना आता ७५०० मे.टन प्रतिदिन गाळप करत आहे.तथापि विस्तारीकरण मुळे कारखान्याची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे.