माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये लॉकडाऊनच्या मंदीतही नोकरीच्या संधी “
सर्व क्षेत्रात यशस्वी असणारे उत्कृष्ट विद्यार्थी घडविण्यासाठी माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयाचा लौकिक आहे.
माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये लॉकडाऊनच्या मंदीतही नोकरीच्या संधी “
कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या सध्याच्या मंदीच्या वातावरणात शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये डिजिटल ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करून कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे विविध आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होत असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम. मुकणे यांनी दिली.
लॉकडाउन सुरू झाल्यापासून जयश्री पॉलिमर , फेस , अन्स्कूल ,क्यूएच टालब्रोझ , मुग्धा इलेक्ट्रॉनिक्स , सिस्टीमॅटिक इत्यादी कंपन्यांनी कॅम्पस प्लेसमेंटसाठी महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन माध्यमांच्या द्वारे प्रक्रिया राबवली.विद्यार्थ्यांच्या निवडीची प्रक्रिया पर्सनल इंटरव्ह्यू व टेक्निकल इंटरव्ह्य़ू या दोन स्तरांवर मूल्यांकन करून संपन्न झाली.
या निवड प्रक्रियेतून एकूण 30 विद्यार्थ्यांची वरील कंपन्यांमध्ये निवड झालेली आहे.क्यूएच टालब्रोझ मध्ये निवड झालेल्या मयूर निगडे ,अनिकेत ढगे ,सूरज मासाळ ,हेमंत माने ,अरविंद जठार , प्रसाद वेदपाठक इत्यादी यांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
फेस मध्ये पूजा कुंभार या विद्यार्थिनीचा निवडीमध्ये समावेश होता.
अन्स्कूल मध्ये निवड झालेल्या शिवानी काकडे , रोहीत पानसरे , अभिलाषा पवार ,धनश्री जगदाळे ,पुजा ठोले ,चैत्राली जगताप , स्नेहल यादव , कीर्तीराज किर्दक ,विष्णू थोरात , प्रतीक्षा मदने , अभिषेक सावंत , गणेश सोनवणे , तुषार मस्के , स्मिरल बांदल इत्यादी विद्यार्थ्यांचा समावेश होता.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक 4.5 लाखांपर्यंत वेतन कंपनीतर्फे देण्यात येणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ. माधव राउळ यांनी दिली.
सर्व क्षेत्रात यशस्वी असणारे उत्कृष्ट विद्यार्थी घडविण्यासाठी माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयाचा लौकिक आहे.
याचाच परिपाक म्हणून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालय नेहमीच अग्रेसर असल्याने बारावीनंतर इंजिनीअरिंगला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालय प्रथम पसंती असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस .एम. मुकणे यांनी विशेष नमूद केले.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच रोजगारक्षम बनवणारे कौशल्य विकसित करण्यासाठी माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये विविध विषयांवर आधारित कार्यशाळांचे तसेच विविध वेबिनार मालिकांचे आयोजन करून देत असल्याने विद्यार्थ्यांना नोकरीची संधी प्राप्त होत असल्याची माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी डॉ. माधव राउळ यांनी दिली.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष
श्री. बाळासाहेब तावरे , विश्वस्त श्री.वसंतराव तावरे , श्री.अनिल जगताप , श्री.महेंद्र तावरे , श्री.रामदास आटोळे , श्री.गणपत देवकाते , श्री.रवींद्र थोरात व सचिव श्री.प्रमोद शिंदे यांनी अभिनंदन केले.