“माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये “गुणवत्ता वाढीसाठी मानांकन” या विषयावर भव्य स्वरूपात एक दिवसीय कार्यशाळा संपन्न “
देशातील विविध राज्यातील तसेच इथोपिया व नायजेरिया या देशांमधून मिळून एकूण 1025 व्यक्तींचा ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे सहभाग .
“माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये “गुणवत्ता वाढीसाठी मानांकन” या विषयावर भव्य स्वरूपात एक दिवसीय कार्यशाळा संपन्न “
देशातील विविध राज्यातील तसेच इथोपिया व नायजेरिया या देशांमधून मिळून एकूण 1025 व्यक्तींचा ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे सहभाग.
शैक्षणिक गुणवत्ता व दर्जा वाढविण्यासाठी राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेकडून
(एन.बी ए.) मानांकन मिळवणे ही सर्व उच्च व तंत्रशिक्षण महाविद्यालयांसाठी काळाची गरज झालेली आहे तसेच हे मानांकन मिळवण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून सर्व महाविद्यालयांना दिशानिर्देश वेळोवेळी देण्यात येत आहेत.
या अनुषंगाने राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेकडून मानांकन मिळवण्याच्या प्रक्रियेविषयी मार्गदर्शन करण्यासाठी 28 जून 2020 रोजी प्राध्यापक विकास कार्यक्रमा अंतर्गत एकदिवसाीय ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील यांत्रिकी विभागा मार्फत करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. एम.मुकणे यांनी दिली .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्रमोद शिंदे उपस्थित होते.कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य
डॉ. एस.एम. मुकणे यांच्या मार्गदर्शनपर भाषणाने झाले.
या कार्यशाळेसाठी एस.आर.ई.एस. इंजिनिअरिंग कॉलेजचे उपप्राचार्य व विभागप्रमुख डॉ.अजयकुमार ठाकूर मुख्य साधन व्यक्ती म्हणून लाभले.
या कार्यशाळेसाठी आपल्या देशातील विविध राज्यातील तसेच इथोपिया व नायजेरिया या देशांमधून मिळून एकूण 1025 व्यक्तींनी आपला सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे आयोजन ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर डॉ.माधव राऊळ यांनी महाविद्यालयाविषयी व सर्वस्तरावर महाविद्यालयाची होणारी प्रगतीविषयी आढावा सर्व सहभागी उपस्थितांपुढे सादर केला.
राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेकडून मानांकन मिळवण्याचे फायदे व महत्त्व याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम. मुकणे यांनी सहभागींना मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेद्वारे एनबीए मानांकन मिळवण्यासाठी लागणारी माहिती समजून घेऊन ही प्रक्रिया आपल्या महाविद्यालयांमध्ये राबविण्यात सर्व सहभागींना निश्चितच फायदा होईल असे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी नमूद केले.
प्रमुख वक्त्यांचा परिचय , स्वागत व कार्यशाळेचा उद्देश याबद्दल कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक प्राध्यापक प्राध्यापक हरिश फडतरे व प्राध्यापक इफ्तिकार पटेल यांनी उपस्थितांना सांगितला.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ.अजयकुमार ठाकूर यांनी मानांकन मिळण्यासाठी लागणाऱ्या विविध विषयांवर आधारीत प्रेझेंटेशन सादर केले.
या प्रेजेंटेशन मध्ये त्यांनी तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांची शैक्षणिक गुणवत्ता पडताळणी साठी लागणारे एकूण दहा निकष व परिमाणाचे मूल्यांकन या विषयावर आधारित विस्तृत माहिती सादर केली.
या कार्यशाळेच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर , विविध माहितीचे संकलन , अध्यापन-अध्ययन सुधार प्रक्रियेविषयी , सध्य परिस्थितीत उद्भवत असलेल्या विविध शैक्षणिक व तांत्रिक शंकांचे निराकरणही प्रमुख वक्त्यांनी केले.
त्याचबरोबर एनबीएचे मानांकन मिळवण्यासाठी विविध स्तरावर येत असलेल्या अडचणींवर मार्गदर्शन केले.
एनबीएतील प्रत्येक निकषावर माहिती सादर करताना डॉ. अजयकुमार ठाकूर यांनी विविध प्रात्यक्षिकांसह सर्व सहभागींना मार्गदर्शन केले.
एनबीए मानांकन मिळाल्यामुळे होणाऱ्या फायद्यामध्ये त्यांनी शासनाकडून विविध उपक्रमांद्वारे महाविद्यालयाला व संशोधन उपक्रमाला मिळणाऱ्या अर्थसहाय्याविषयी , विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या फायद्याविषयी माहिती सादर केली.
नाविन्यपूर्ण आणि समाजपयोगी संशोधनावर भर देण्याचे आवाहनही मुख्य प्रवक्त्यांनी सर्व सहभागींना यावेळी केले.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल काही निवडक सहभागींनी वक्त्यांचे व आयोजकांचे कौतुक केले.
सखोल प्रश्नोत्तराच्या सत्रानंतर कार्यशाळेची सांगता झाली.
या कार्यक्रमासाठी प्राध्यापक इफ्तिकार पटेल , प्राध्यापक हरिष फडतरे व यांत्रिकी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. माधव राऊळ यांनी केले व आभार प्रदर्शन यांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. सुशिल पाटील यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष श्री.बाळासाहेब तावरे संस्थेचे सचिव श्री.प्रमोद शिंदे यांनी प्राचार्य , विभाग प्रमुख व कार्यक्रम समन्वयक यांचे विशेष कौतुक केले.