“माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ऑनलाईनद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी 44 वेबिनार सत्रांच्या मालिकांचे आयोजन “
माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयामधील ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचा नाविन्यपूर्ण क्रियाशील उपक्रम .
“माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ऑनलाईनद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी 44 वेबिनार सत्रांच्या मालिकांचे आयोजन “
माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयामधील ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचा नाविन्यपूर्ण क्रियाशील उपक्रम .
शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने कोरोनामुळे उद्भभवलेल्या लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ऑनलाइनद्वारे वेबिनार सत्रांच्या मालिकांचे आयोजन लॉकडाऊन सुरु झाल्यापासून करण्यात येत आहे. लॉकडाऊननंतर येणाऱ्या आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयातील ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत ऑनलाइन माध्यमांच्याद्वारे विविध विषयांवर आधारित नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधील तज्ञांद्वारे वेबिनार सत्रांच्या मालिकांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम. मुकणे यांनी दिली.या वेबीनार मालिकांचे आयोजन ऑनलाइन डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे विद्यार्थ्यांसाठी करण्यात येत आहे. इंडस्ट्रीतील नामांकित व तज्ज्ञ वक्त्यांचे विविध विषयावर आधारित जसे अॅप्टिट्यूड इम्प्रुमेंट प्रोग्रॅम , ग्रुप डिस्कशन इम्प्रुमेंट प्रोग्रॅम , कम्युनिकेशन स्किल्स इम्प्रुमेंट प्रोग्रॅम , चॅलेंजेस आफ्टर लॉकडाऊन , अॅपॉर्च्युनिटी इन थ्रेट
(संकट काळातील संधी ) , आत्मविश्वास निर्माण व विकास , बायोडाटा रायटिंग , इंटरव्यू टेक्निक्स , कॅम्पस प्लेसमेंट प्रिपरेशन , स्पर्धा परीक्षांची तयारी व मार्गदर्शन इत्यादी अद्ययावत विषयावर वेबिनारचे आयोजन व मार्गदर्शन महाविद्यालयामार्फत विद्यार्थीसाठी करण्यात येत आहे.वेबिनारसाठी उपस्थित असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रमाणपत्र देण्याची व्यवस्थाही ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाद्वारे करण्यात येत आहे. प्रत्येक वेबिनारच्या दरम्यान मुख्य वक्ते विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन व समाधान करत आहेत. तसेच भविष्यात येणाऱ्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हला सामोरे जाण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी फेस कॅम्पस कॅप्सूल ,ऑनलाइन हॅन्ड्सऑन ट्रेनिंग ,फ्यूल व नॅसकॉम अंतर्गत विविध टेक्निकल कोर्सेसचे आयोजन , टीसीएस डिजिटल कोर्सेसचे आयोजनही करण्यात येत असल्याची माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. माधव राऊळ यांनी दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य , विविध विभाग प्रमुख आणि सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना ऑनलाइन वेबिनार सत्राचा जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी प्रवृत्त करून या उपक्रमांचा पाठपुरावा देखील घेत आहेत. वेबिनार सत्राच्या आयोजनामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी खूप फायदा होत आहे.या उपक्रमाचा फायदा व परिणाम म्हणूनच लॉकडाऊनमध्ये ही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड होत आहे यामध्ये रिलायन्स जिओ ,सिस्टीमॅटिकस , जयश्री पॉलिमर , धूत ट्रान्समिशन , मुग्धा सिस्टीम , अन्स्कूल , स्पेशालिस्ट प्रोडक्ट्स , इटर्नस सोल्युशन , फेस , जेएनएस इत्यादी कंपन्यांचा समावेश आहे.आतापर्यंत महाविद्यालयातील 187 विद्यार्थ्यांची विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झालेली आहे व ही प्रक्रिया अजूनही सुरूच आहे.लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांनी ऑनलाइन वेबिनार सत्राद्वारे कौशल्य विकसित करून येणाऱ्या आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जावे व कोरोना विषयी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून आपली व कुटुंबाची योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहनही यावेळी प्राचार्य डॉ. एस.एम.मुकणे यांनी केले.
सदर वेबिनार सत्राचे आयोजन व नियोजन करण्यासाठी डॉ. माधव राऊळ , प्रा. हेमंत कुंभार , प्रा. जावेद शेख व विद्यार्थी प्रतिनिधी अविनाश तनपुरे विशेष परिश्रम घेत आहेत.वेबिनार सत्रांची मालिका यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री. बाळासाहेब तावरे व सचिव श्री प्रमोद शिंदे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.