माळेगाव कारखाना च्या कामगारांना होमिओपॅथीक गोळ्यांचे वाटप.
योगेश जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम.
माळेगाव कारखाना च्या कामगारांना होमिओपॅथीक गोळ्यांचे वाटप.
योगेश जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम.
बारामती:वार्तापत्र -माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक तसेच बारामती नगरपरिषद चे माजी. नगराध्यक्ष योगेश जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माळेगाव सहकारी साखर कारखाना मधील सर्व कामगार वर्ग व अधिकारी वर्गांना आर्सेनिक अल्बम या औषधाच्या किट चे आज वाटप करण्यात आले .
भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने कोरोना व्हायरस संक्रमणाच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक औषध आर्सेनिक अल्बम हे होमिओपॅथीक औषध सुचवले आहे. आणि याच औषधाच्या किटचे मोफत वाटप आज करण्यात आले.
सध्या राज्यात आणि देशात कोरोनाचे जे संकट आले आहे. ज्यांच्यावर अद्याप उपचार निघाला नाही. मात्र प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाच्या संसर्गजन्य आजारापासून सुरक्षित वाचण्यासाठी आज संपुर्ण जगातच लॉकडाऊन व सोशल डिस्टगसिंग व रोगप्रतिकार शक्ती वाढवणे यावर भर देण्यात येत आहे. हाच विचार करून व सामन्य कामगार वर्ग डोळ्यासमोर ठेऊन योगेश(भैय्या) जगताप मित्र मंडळ यांच्या वतीने वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक जाणीव व बांधिलकीच्या नात्याने सदर उपक्रम राबविण्यात आला. सदर औषधांचे किट माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक व्हि.एम.वाबळे, कारखान्याचे वैद्यकिय अधिकारी शेखर देवकाते, व सर्व खाते प्रमुख यांना सुपूर्द करण्यात आले.
याप्रसंगी कौशलशेठ शहा(सराफ), माजी.सरपंच संग्राम जगताप, माजी.उपसरपंच अजित जगताप, बाळासाहेब कोकरे, पप्पू जगताप, संदिप आढाव, निलेश महाडिक, चंद्रजित धुमाळ, अलीअसगर बारामतीवाला, युसुफ कायमखानी, कैलास वणवे, बजरंग जगताप, दादा जराड, विकास जगताप, मेहूल दोशी, इत्यादी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.