बारामती शहरातील दबंग पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांची नियंत्रण कक्षात तडफडी बदली: बारामतीचे नवे पोलीस निरीक्षक जेजुरीचे सुनील महाडिक
बदलीचे कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे…

बारामती शहरातील दबंग पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांची नियंत्रण कक्षात तडफडी बदली: बारामतीचे नवे पोलीस निरीक्षक जेजुरीचे सुनील महाडिक
बदलीचे कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे…
बारामती वार्तापत्र
बारामती शहर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकपदी सुनिल महाडिक यांची नियूक्ती करण्यात आली आहे. नामदेव शिंदे यांची मुख्यालयात तडकाफडकी बदली करण्यात आली असून गेल्या काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका प्रकरणात त्यांचा सहभाग समोर आल्याने त्यांची बदली झाल्याची चर्चा होऊ लागली आहे.
रात्री नियंत्रण कक्षाला त्यांची बदली करण्यात आली असून बारामतीची सूत्रे जेजुरीचे पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांच्याकडे देण्यात आली आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी रात्री उशीरा बदल्या केल्या. नोव्हेंबर २०२० मध्ये शहर पोलिस ठाण्याच्या निरीक्षकपदाची सूत्रे शिंदे यांनी स्वीकारली होती. सुरुवातीपासूनच ते चर्चेत होते. गेल्या आठवड्यापासून त्यांच्यावर एक बालंट आले होते.
बारामती शहरांमध्ये शिंदे यांनी मोठ्या प्रमाणावर अवैध धंद्यांना लगाम लावला होता,तसेच पोलीस ठाण्याच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत शहर पोलीस ठाण्याचा कायापालट केला होता,असे असताना नामदेव शिंदे यांची अचानक बदली झाल्याने नेमके बदलीचे कारण काय ? असा प्रश्न बारामतीकरांना पडला आहे..बारामती शहरात अतिशय चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली अचानक होते हादेखील प्रश्न आता बारामतीकरांना सतावत आहे.असो मात्र बदलीचे कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे…नक्की ह्या गुलदस्त्यातुन काही वेगळा प्रकार बाहेर येणार का ? अशी चर्चा आता तालुक्यातील नागरिकांत रंगली आहे.