माळेगाव पोलिसांनी छापा टाकत हातभट्टी दारुचा साठा केला जप्त
४५५ लिटर हातभट्टी तयार दारू मिळून आली आहे
माळेगाव पोलिसांनी छापा टाकत हातभट्टी दारुचा साठा केला जप्त
४५५ लिटर हातभट्टी तयार दारू मिळून आली आहे
बारामती वार्तापत्र
माळेगाव पोलिसांनी हातभट्टी केंद्रावर छापा टाकत हातभट्टी दारुचा मोठा साठा जप्त केला आहे.या प्रकरणी ओमकार आडके (रा:तुकाईनगर सांगवी ता: बारामती जि:पुणे) याला ताब्यात घेत
एकूण २२ हजार ७५० रूपये किमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे, पोलीस नाईक राजेंद्र काळे, पोलीस नाईक दत्तात्रय चांदणे हे बारामती तालुक्यातील सांगवी येथे गस्त करत होते. या दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की,ओमकार आडके (रा: तुकाईनगर सांगवी तालुका बारामती जिल्हा पुणे) याने त्याच्या राहत्या घरातील शेजारील शेडमध्ये मोठ्या प्रमाणात दारूचा साठा विक्रीसाठी केला आहे. अशी बातमी मिळाली, बातमी मिळताच राहुल घुगे यांनी पंचांसमक्ष सदर ठिकाणी छापा टाकला
सदर ठिकाणी एकूण २२ हजार ७५० रुपये किमतीची १३ हत्ती कॅन मध्ये एकूण ४५५ लिटर हातभट्टी तयार दारू मिळून आली आहे. सदर ठिकाणी ओमकार आडके यास ताब्यात घेऊन पोलीसांनी विचारपूस केली असता त्याने त्याचा साथीदार सुनील सचिन खुडे राहणार सांगवी तालुका फलटण जिल्हा सातारा त्याच्या मदतीने सदर चा व्यवसाय करीत असल्याचे सांगितले आहे. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.