माळेगाव बुद्रुक येथे आज विद्यार्थिनींना सायकल वाटप
जि.प.सदस्या सौ रोहिणी तावरे यांच्या निधीतून वाटप
माळेगाव बुद्रुक येथे आज विद्यार्थिनींना सायकल वाटप
जि.प.सदस्या सौ रोहिणी तावरे यांच्या निधीतून वाटप
बारामती वार्तापत्र
पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ रोहिणी रविराज तावरे (लाखे ) यांनी आज माळेगाव बुद्रुक येथे विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप केले.
जिल्हा परिषदेच्या सदस्या रोहिणी तावरे यांच्या जिल्हा परिषद निधीतून येथील श्रीमंत शंभू सिंह महाराज हायस्कूल मधील इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप तसेच भजनी साहित्य व सांस्कृतिक साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेसाठी अंडरग्राउंड ड्रेनेज, तसेच मुलांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची टाकी बांधून मिळावी व ग्राउंड वर हायमास्ट लॅम्प लावावा अशी मागणी केली. रोहिणी तावरे यांनी आपल्या भाषणात या सर्व मागण्या पूर्ण करणारच असून याशिवाय ओपन जिम ही आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देणार आहोत असे सांगितले.
यावेळी शिक्षण सेवा मंडळाचे विश्वस्त रमेश पाटील गोफणे ,रविराज तावरे ,बंटी चव्हाण ,शाळेचे मुख्याध्यापक श्री धुमाळ सर, उप प्राचार्य घुले सर, सर्व शिक्षक वर्ग व कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते.