माळेगाव मध्ये जुगार खेळनाऱ्यावर कारवाई.
33 जणांना अटक,9 लाख 70 हजार 40 रुपये चा मुद्देमाल जप्त.

माळेगाव मध्ये जुगार खेळनाऱ्यावर कारवाई.
33 जणांना अटक,9 लाख 70 हजार 40 रुपये चा मुद्देमाल जप्त.
बारामती:वार्तापत्र बारामती तालुक्यातील माळेगाव येथे जुगार खेळणाऱ्यावर कारवाई करीत 33 जणांना पोलीसानी अटक केली आहे.
पोलिसांची जुगार अड्ड्यावर कारवाई बारामती तालुक्यातील माळेगाव येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून ९ लाख ७० हजार ४० रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ३३ जणांवर तालुका पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी माहिती बारामती चे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली त्याचा हा व्हिडीओ पहा.
उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून (रमाबाई नगर माळेगाव ता. बारामती ) येथे रमन गायकवाड व इतर एका बंगल्यात बेकायदा पत्त्याचा क्लब चालवुन पैशावर जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी छापा टाकून रोख रक्कम ७ दुचाकी १ चार चाकी, गाड्या व इतर जुगाराचे साहित्य असा एकूण ९ लाख ७० हजार ४० रुपयेचा मुद्देमाल व जुगार खेळणाऱ्या ३३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सदरची कारवाई अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडील पो.उ.नि. संदीप गोसावी, पो.हवा सुरेश भोई, पो.ना रमेश केकाण, आप्पा दराडे, वैभव साळवे, गणेश काटकर, राहूल लाळगे, दत्तात्रय गवळी तसेच आर.सी.पी. पथक क्रमांक ३ मधील श्रीकांत गोसावी,रज्जाक मणेरी, आबा जाधव, सचिन दरेकर, अमोल चितकुटे, सागर कोरडे, सुजीत शिंदे, प्रियंका झणझणे, मेघा इंगळे, मंगल बनसोडे यांनी केली.
या वर्षीची सर्वात जुगार विषयातील मोठी कारवाई आहे त्यामुळे नागरिका मधून समाधान व्यक्त होत आहे