माळेगाव सभासदांना देणार 2459 रुपये
सोमेश्वर पाठोपाठ ‘माळेगावची ‘ ची एफ आर पी जाहीर
बारामती वार्तापत्र
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामातील ऊसाची एफआरपी एक रकमी चोवीसशे एकोणसाठ रुपये प्रति टन जाहीर करण्यात आली आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी एफ आर पी ची पूर्ण रक्कम सभासदाच्या बँक खात्यात जमा करणार असल्याची ही माहिती दिली
माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चालू गळीत हंगामात दोन लाख 43 हजार टन उसाचे गाळप झाले आहे त्याचबरोबर यंदा पाऊस काळ जास्त असल्यामुळे माळेगाव च्या कार्यक्षेत्रात उसाची उपलब्धता जास्त असणार आहे
जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी एक रकमी एफ आर पी देण्याचे जाहीर करावे
पुणे जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी सभासदांना ऊसाची एफआरपीप्रमाणे होणारी रक्कम एक रकमी अदा करावी,शेतकरी आर्थिक संकटात असताना त्याला त्याचा उपयोग होईल अशी मागणी माळेगाव कारखान्याचे माजी चेअरमन रंजन काका तावरे यांनी केली