मावळा जवान संघटना च्या वतीने “राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार” सोहळा संपन्न
संघटनेच्या वतीने गेल्या ४१ वर्षांपासून जिजाऊ जन्मोत्सव साजरा केला जात

मावळा जवान संघटना च्या वतीने “राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार” सोहळा संपन्न
संघटनेच्या वतीने गेल्या ४१ वर्षांपासून जिजाऊ जन्मोत्सव साजरा केला जात
बारामती वार्तापत्र
राजमाता जिजाऊ यांचा ४२७ वा जन्मोत्सव सोहळा रविवारी राजगड (दि. १२) येथे मावळा जवान संघटना यांच्या वतीने साजरा करण्यात आला.
कर्तृत्ववान महिलांसह विविध क्षेत्रातील गुणवंतांचा,गौरव करण्यात आला.पाल बुद्रुक येथील मावळा तीर्थावर मावळा जवान संघटनेच्या वतीने व्याख्यान आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते मानाची शासकीय पूजा करण्यात आली.रायरेश्वर शिवपीठाचे शिवाचार्य स्वामी सुनील महाराज जंगम यांच्या हस्ते शिववंदना, गौरव आखाड्याचे प्रमुख गिरीश भैरू नार्वेकर व सहकाऱ्यांच्या शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिके करण्यात आली.
आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते सौ.रंजना विजयकुमार हांगे व आदर्श सरपंच गौरी भरतवंश यांना पुरस्कार देण्यात आला.
आमदार रावसाहेब दानवे,माजी आमदार संग्राम थोपटे,जिल्हा परिषदेच्या सदस्या अनिताताई इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण राऊत आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी, विविध शिवप्रेमी संघटनांचे कार्यकर्ते तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यातील मावळ्यांचे वारसदार श्री संजयजी कंक (सरनोबत येसाजी कंक वंशज)श्री सुरेशजी मोहिते (सरसेनापती हंबीरराव मोहिते वंशज) श्री दत्ताजी नलावडे (लेखक,इतिहास संशोधक) रोहित नलावडे युवक अध्यक्ष यांच्या हस्ते “विशेष सन्मान पुरस्कार” सौ अर्चनाताई सातव(अध्यक्षा अखिल भारतीय मराठा महासंघ बारामती) नानासाहेब साळवे (योद्धा प्रोडक्शन अँड पब्लिसिटी) चेतन शेंडे, अश्विनीकुमार पत्की,नितिन मांडगे, प्रदिप ढुके अध्यक्ष मावळा जवान संघटना,स्वराज्य प्रतिष्ठान बारामती,अर्चना ढुके, दिपाली जाधव,पूनम मांडगे यांना देण्यात आला.
या सोहळ्यात जिजाऊ,शिवराय व वीरमावळ्यांचा वारसा जागविण्यासाठी मावळा जवान संघटनेच्या वतीने गेल्या ४१ वर्षांपासून जिजाऊ जन्मोत्सव साजरा केला जात आहे.
शाहिरी पोवाडे. शिवकालीन शस्त्रास्त्र खेळ, पालखी मिरवणूक आदी कार्यक्रम आयोजित
केले जात आहेत,माहिती संघटनेचे
संस्थापक व इतिहास अभ्यासक दत्तात्रय नलावडे यांनी दिली.आभार बारामती तालुका अध्यक्ष प्रदीप ढुके यांनी मानले.