मावळा जवान संघटना व स्वराज्य फाऊंडेशन च्या वतीने किल्ले बांधणी स्पर्धेतील स्पर्धकांचा सन्मान
250 स्पर्धकांनी सहभाग घेतला

मावळा जवान संघटना व स्वराज्य फाऊंडेशन च्या वतीने किल्ले बांधणी स्पर्धेतील स्पर्धकांचा सन्मान
250 स्पर्धकांनी सहभाग घेतला
बारामती वार्तापत्र
बारामती येथील मावळा जवान संघटना संचलित स्वराज्य फाउंडेशन यांच्या वतीने दिवाळीत भव्य गड किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते व सहभागी आणि विजेत्या विद्यार्थी चा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी मावळा जवान संघटनेचे अध्यक्ष प्रदीप ढुके,अश्विनीकुमार पतकी,नितीन मांडगे,नानासाहेब साळवे , रमेश मरळ-देशमुख आदी उपस्थित होते.
आधुनिक काळात देखिल इतिहास, गड-किल्ले यांचा वारसा जपणे महत्वाचे आहे पुढील पिढीला इतिहास माहीत व्याहवा या उदेश्याने सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याचे अध्यक्ष प्रदीप धुके यांनी सांगितले.
किल्ला बांधणी 2024 स्पर्धेचे हे 7 वे वर्ष असून दिनांक 30 ते 5 या कालावधीत करण्यात नियोजन करण्यात आले होते. यातील विजेत्यांना नुकतेच गौरविण्यात आले. स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला.मोहिमेमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी होऊन शूरवीर मावळ्यांचा इतिहास पुढील येणाऱ्या पिढीने जपावा यासाठी या गड-किल्ले बांधणी मोहिमेमध्ये दरवर्षी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले.
बारामती तालुक्यातील 250 स्पर्धकांनी सहभाग घेतला.या वर्षीचे विशेष इंदापूर,दौंड, भोर, सातारा, कोल्हापूर याठीकानाहून अनेकांनी स्पर्धेसाठी नोंदणी झाली होती यामध्ये काटेवाडी येथील महेश काटे यांनी उत्कृष्ट असा लोहगड किल्ला बनविला. निंबुत येथील अवधूत येळे,नेवसे रोड येथील गौरव तपकिरे यांनी विविध गटात क्रमांक मिळवला. सहभागींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.फेब्रुवारी 2025 रोजी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुण्यदिनानिमित इतिहासकालीन मावळ्यांचे वंशज यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार देण्यात येणार असल्याचे एखादी सांगितले.