मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करा उपमुख्यमंत्री अजित पवार.
कोरोना प्रतिबंधित उपाययोजना प्रभावीपणे राबवणे गरजेचे आहे.
मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करा
उपमुख्यमंत्री अजित पवार.
बारामती वार्तापत्र
बारामती शहरासह तालुक्यात कोरोनाचा संसर्ग झपाटयाने वाढत असल्याने मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना विषाणूचा संसर्ग बारामती शहरासह तालुक्यात झपाट्याने वाढत आहे. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करा, असे निर्देश त्यांनी प्रशासनास दिले. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी दक्ष राहून कोरोना प्रतिबंधित उपाययोजना प्रभावीपणे राबवणे गरजेचे आहे.
कोरोना रुग्णालयात रुग्णांना देण्यात येत असलेले जेवण हे चांगल्या प्रतीचे असावे. गंभीर रुग्णांना तात्काळ हॉस्पिटल मध्ये ॲडमिट करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
कोरोना विषाणू संसर्ग वाढू नये, यासाठी नागरिकांनी देखील अधिक दक्ष राहून गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल, याची काळजी घ्यावी, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन देखील त्यांनी केले.
उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बारामती तालुक्यातील कोरोना बाबतची सद्य:स्थिती व कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.