खा. शरद पवार यांच्या वाढदिवसा दिवशी निघणार रथयात्रा
रुग्ण हक्कासाठी नागरिकांमध्ये जागृती....

खा.शरद पवार यांच्या वाढदिवसा दिवशी निघणार रथयात्रा
रुग्ण हक्क परिषदेने केली घोषणा
बारामती वार्तापत्र
दवाखाना म्हटलं की सामान्य माणसाच्या काळजाचा थरकाप होतो दवाखान्याची आणि कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात त्याचं कारणही तसंच आहे सामान्य माणसाचा अवाका बाहेरचा दवाखान्याचा बिल ज्यावेळी समोर येतो त्यावेळी रुग्णाला आपल्या आरोग्याची किंमत समजते यासाठी रुग्ण हक्क परिषद महाराष्ट्र प्रदेश यांचे वतीने फौजदारी संहितेत रुग्ण हक्क संरक्षण कायदा अमलात यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या गोविंदबाग पासून 12 डिसेंबर रोजी ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यापर्यंत पर्यंत रुग्णहक्क परिषद महाराष्ट्र प्रदेश रथ यात्रा काढणार आहे यामध्ये समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांनी यामध्ये भाग घ्यावा असे आवाहन रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केले आहे
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कोरोना च्या काळामध्ये अनेक हॉस्पिटल मध्ये एकही बेड शिल्लक नव्हते काही ठिकाणी ऑक्सीजन नाही आयसीयू नाही अशी परिस्थिती होती कोणत्याही दवाखान्यात गेले तरी किमान पन्नास हजार रुपये भरा मग ते ऍडमिट करू त्यामुळे सामान्य गरिबाला दररोज मरण येत होते सरकारी हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन नाही आयसीयू नाही काही ठिकाणी तर डॉक्टरही नाहीत अशी स्थिती आहे रेमेडीसेवर हे इंजेक्शन सामान्य माणसाला परवडत नाही स्मशानभूमीत प्रेताचे दहन करायला आठ तास वेटिंग करावं लागतं जगण्याच्या लढाईत रुग्ण हक्क परिषद सामान्य माणसाच्या बरोबर आहे मात्र प्रत्येक वेळी कुठे कुठे पोहोचणार म्हणून रुग्णांच्या हक्कासाठी समाजातील सर्व नागरिकांनी या यात्रेमध्ये सामील होवून अनेक रोगांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सामान्य माणसाचा जीवन जगणे मुश्किल झालेला असताना लोकांनी या रुग्णांचा परिषदेच्या रथयात्रा मध्ये सामील व्हावं वेळप्रसंगी रस्त्यावर उतरावं लागले तरी चालेल म्हणून सरकारचे मार्गदर्शक खासदार शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या घरापासून ते मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत रथयात्रेचे आयोजन करण्यात आलेला आहे