“मी गावकरी स्वच्छता माजी जबाबदारी” ग्रामस्वच्छता अभियान पारवडी.
ग्रामस्वच्छता अभियान ची कल्पना आली व त्यांनी 5 जून रोजी त्याची सुरुवात केली
“मी गावकरी स्वच्छता माजी जबाबदारी” ग्रामस्वच्छता अभियान पारवडी.
ग्रामस्वच्छता अभियान ची कल्पना आली व त्यांनी 5 जून रोजी त्याची सुरुवात केली
बारामती वार्तापत्र
पारवडी गावचे उच्चशिक्षित युवा सामाजीक कार्यकर्ते पांडुरंग रामदास शिपकुले यांच्या मनामध्ये ग्रामस्वच्छता अभियान ची कल्पना आली व त्यांनी 5 जून रोजी त्याची सुरुवात केली.सुरवातीचे दोन आठवडे ते दर रविवारी एकटेच स्वच्छता करत होते कालांतराने पांडुरंग शिपकुले यांचे मित्र राहुल बेंगारे,हर्षद गावडे, सागर गवंड यांनी ग्रामस्वच्छता अभियान राबण्यास सुरवात केली असे करत दर रविवार सात ते आठ युवक ग्रामस्वच्छता करण्यास उपस्थित राहतात,आत्तापर्यंत 13 आठवडे पूर्ण झालेले आहेत.
आत्त पर्यंत गावतील स्मशानभूमी, तलाठी कार्यालय,पशु वैद्यकीय दवाखाना,आरोग्य केंद्र, ओढ्यावरील पूल,सामाजिक ठिकाण अश्या अनेक ठिकाणी ग्रामस्वच्छता करण्यात आलेली आहे.’ग्रामस्वच्छता मोहिमेतील सहभाग आपल्याला कचरा करण्यापासून पारावृत्त करतो’.यामुळे नक्कीच गावात रोगराई कमी होण्यास मदत होईल.
ह्यास टॅग-स्वछ पारवडी,सुंदर पारवडी