मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या निलंबनाची राज्य सरकारकडून तयारी
माजी गृहमंत्री अनिल देशमुख 100 यांच्यावर देखील त्यांनी गंभीर आरोप केले आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या निलंबनाची राज्य सरकारकडून तयारी
माजी गृहमंत्री अनिल देशमुख 100 यांच्यावर देखील त्यांनी गंभीर आरोप केले आहे.
प्रतिनिधी
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या निलंबनाची राज्य सरकारकडून तयारी सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे. खंडणी प्रकरणी परमबीर सिंह यांच्या खटला सुरू आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर देखील त्यांनी गंभीर आरोप केले आहे. या आरोपावरून सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई होत आहे. निलंबनाच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केल्याची माहिती आहे.
कोट्यावधी रुपयांच्या कथीत खंडणी वसुलीप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्यासह तब्बल 29 आरोपींवर ठाणे नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. मात्र, न्यायालयात आरोपपत्र सादर न केल्याच्या कारणास्तव आरोपींनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. जामीन अर्जावर ठाणे न्यायालयात मंजुरीचे शिक्कामोर्तब करण्यात आले. या दोन्ही आरोपींना जामीन मंजूर झाल्याने सरकारी वकील आणि फिर्यादी यांचे वकील यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.