मुंबई उच्च न्यायालयातील जेष्ठ विधीज्ञ ॲड. भास्करराव आव्हाड यांचे निधन.
कोरोनावर उपचार चालु असताना पुण्यात त्यांचा मृत्यु झाला.

मुंबई उच्च न्यायालयातील जेष्ठ विधीज्ञ ॲड. भास्करराव आव्हाड यांचे निधन.
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे माजी अध्यक्ष व जेष्ठ विधीज्ञ ॲड. भास्करराव आव्हाड यांचे आज कोरोनाच्या आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते.
कोरोनावर उपचार चालु असताना पुण्यात त्यांचा मृत्यु झाला.
राज्यातील शेकडो न्यायाधीश तयार करण्यात तसेच वकिलाना मार्गदर्शन करण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. दैनिक सकाळसह अनेक वृत्तपत्रात त्यांचे अनेक वैशिष्ट्यपुर्ण लेख प्रकाशीत झाले आहेत. मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात त्यांचे अनेक खटले महत्वपूर्ण ठरले होते. वयाची तमा न बाळगता ते सातत्याने कार्यरत राहून राज्यभर फिरत वेगवेगळ्या वकिल संघटनांना मार्गदर्शन करत होते.
लॉकडाऊन दरम्यान घरी थांबून त्यांनी हजारो वकिलांना ऑनलाईन मार्गदर्शन केले होते. त्यांच्या निधनामुळे विधी क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. ॲड. भास्करराव आव्हाड यांच्या पश्चात मुलगा महाराष्ट्र व गोवा बारचे सदस्य ॲड. अविनाश आव्हाड व दोन मुली,पत्नी, ॲड. सुधाकर आव्हाड व पुतणे असा परिवार आहे.