मुंबई-पुणे नको आत्ता इंदापुरातच शेतकऱ्यांसाठी तरकारीची मोठी बाजारपेठ
परिसरातील शेतकऱ्यांना होणार मोठा लाभ

मुंबई-पुणे नको आत्ता इंदापुरातच शेतकऱ्यांसाठी तरकारीची मोठी बाजारपेठ
परिसरातील शेतकऱ्यांना होणार मोठा लाभ
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर कृषी उत्त्पन्न बाजार समिती कडून इंदापूर शहरातील मुख्य बाजार मार्केट कमिटी येथे सोमवारी ( दि.३० ) नव्याने टोमॅटो, फळे व भाजीपाला बाजार सुरू करण्यात आला आहे. सदरील बाजार पेठेचे उदघाटन इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रय फडतरे यांच्या हस्ते करण्यात आले.
इंदापूर परिसरातील शेतकऱ्यांना तरकारीची मोठी बाजारपेठ नव्हती,शेतकऱ्यांना अकलूज, बारामती,पुणे,मुंबई या ठिकाणी जाऊन आपला माल विकावा लागत होता.त्यामुळे माल वाहतूकीसाठी शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात होणारा खर्च वाचणार असून परिसरातच मोठी बाजारपेठ उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे.
इंदापूर,बारामती,माढा, माळशिरस, करमाळा तसेच पुणे,सोलापूर,उस्मानाबाद, सातारा, व अहमदनगर जिल्ह्यातील सर्व टोमॅटो, फळे व भाजीपाला उत्पादक शेतकरी,खरेदीदार,व्यापारी,वाहतूकदार, यांची मागणी विचारात घेऊन इंदापूर या ठिकाणी खरेदी विक्री व्यवहार सुरू करण्यात आला आहे.सदरील बाजारपेठ दररोज सायंकाळी ५ ते १० वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचे बाजार समितीचे सभापती दत्तात्रय फडतरे यांनी सांगितले.
यावेळी संचालक मधुकर भरणे, मेघशाम पाटील,संग्रामसिंह निंबाळकर,रोहित मोहोळकर,अंकुशराव रणमोडे,महावीर गांधी,सुभाष दिवसे, संतोष वाबळे,दत्तात्रय सपकळ, शिवाजी इजगुडे,भाऊसाहेब सपकळ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी,आडत व्यापारी,शेतकरी उपस्थित होते.