प्रशासकीय भवन येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशासकीय भवन येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बारामती वार्तापत्र
बारामती येथील प्रशासकीय भवन परिसरामध्ये आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम प्रशासकीय भवन व बारामती नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. प्रत्येक कार्यालयाने प्रत्येकी 20 वृक्षाचे रोपण करण्याचे ठरविण्यात आले होते. या वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरूवात प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी तहसिलदार विजय पाटील, उपविभागीय कृषि अधिकारी बालाजी ताटे, सहायक निबंधक मिलिंद टांकसाळे, निवासी नायब तहसिलदार धनंजय जाधव, नायब तहसिलदार महादेव भोसले, तालुका कृषि अधिकारी दत्तात्रय पडवळ, डॉ. महेश गायकवाड तसेच प्रशासकीय भवन येथील व नगरपरिषद विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्रितपणे एकूण 230 वृक्षाचे रोपण करण्यात आले.