मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 247 कोटी जमा
मुंबई दि. 16: कोरोना विषाणूविरुद्धच्या लढ्यात आता महाराष्ट्रातील जनता शासनासोबत सहभागी होत असून आज एलआयसी गोल्डन ज्युबली फाऊंडेशनने 1 कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिली. या सर्व दानशूर हातांच्या मदतीमुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आतापर्यंत 247 कोटी रुपये जमा झाले आहेत.कोराना विषाणूविरुद्ध लढताना आपली एकजूट, सहकार्याचे हात आणि मोलाची साथ मला अपेक्षित आहे अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती. याच भावनेला राज्यातील दानशूर जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला आणि या विषाणूविरुद्ध लढण्याची तयारी दाखवली. ज्यांना जी जी मदत करणे शक्य होते त्यांनी त्या मदतीसाठी हात पुढे केले. मदतीचे धनादेश, वस्तू, अन्नधान्याचा पुरवठा, गोरगरीब-अडकून पडलेल्या जनतेच्या जेवणाची व्यवस्था अशा नानाविध स्वरूपातून मदतीचे हे हात पुढे येत आहेत. मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना मनापासून धन्यवाद दिले आहेत.