रयत शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांकडून विद्यालयास ठिबक संच साहित्य भेट
विद्यालयाच्या परिसरात केले वृक्षारोपण

रयत शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांकडून विद्यालयास ठिबक संच साहित्य भेट
विद्यालयाच्या परिसरात केले वृक्षारोपण
इंदापूर : प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेच्या सौ.कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या १९८९ मध्ये दहावीच्या वर्गात असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करून विद्यालयास ठिबक संच साहित्य भेट दिले.एस.टी. कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे,प्रगतशील बागायतदार बाळासाहेब पाटील व शिक्षिका सुरेखा कुटे या तीन माजी विध्यार्थ्यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.
विद्यालय व माजी विद्यार्थी संघटना यांच्या माध्यमातून विद्यालय परिसरात दीड हजार वृक्षांचे रोपण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यासाठी लागणारे सर्व साहित्य माजी विद्यार्थ्यांकडून पुरवले जाईल असे माझी विद्यार्थी सुरेश सोनवणे यांनी सांगितले. तसेच वृक्षारोपणासाठी लागणारी सर्व देशी झाडे शहा नर्सरीच्या वतीने मोफत देण्यात येतील असे सांगितले. यावेळी या तुकडीतील पंचवीस-तीस विद्यार्थी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थी दशेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला व यापुढे विद्यालयाच्या अडचणी सोडवण्यासाठी व मदतीसाठी नेहमी प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिले.
सदरच्या कार्यक्रमाला इंदापूरच्या प्रथम नागरिक अंकिता शहा, माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, इंदापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, माजी विद्यार्थी व गटनेते कैलास कदम इत्यादी मान्यवर उपस्थित होते. विद्यालयात लावणाऱ्या सर्व झाडांचे संगोपन केले जाईल असे विद्यालयाचे प्राचार्य रामचंद्र पाटील यांनी सांगितले. यावेळी पर्यवेक्षक विजय शिंदे, हरित सेना प्रमुख नितीन मदने, सुनील मोहिते व विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते.