मुर्टीतील युवकांचा रक्ताची तूट भरून काढण्यास हातभार….

दरम्यान १०६ बॉटल रक्तबॅग संकलित झाल्या.

मुर्टीतील युवकांचा रक्ताची तूट भरून काढण्यास हातभार….

दरम्यान १०६ बॉटल रक्तबॅग संकलित झाल्या.

मुर्टी ;बारामती वार्तापत्र रिपोर्ट

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक लालासाहेब नलावडे यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून शिवजयंती उत्सव समिती मुर्टी, सह्याद्री प्रतिष्ठान मुर्टी, बारामती यांनी आयोजन केले होते.त्यास पंचक्रोशीतील युवकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पुणे जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोदकाका काकडे-देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन शिवजयंती उत्सव समिती मुर्टी, सह्याद्री प्रतिष्ठान बारामती विभाग, तसेच अभिजीत नलावडे, शरद साळुंखे, राहुल चव्हाण, सचिन जगदाळे, निलेश शेलार, स्वप्निल शहा, दिनेश भोसले, निलेश मांढरे, तुषार जगदाळे, श्रीकांत बालगुडे, संजय खोमणे, शिवा गदादे, सनी बालगुडे, रवी शिंदे, दशरथ गदादे यांनी केले होते.
संपूर्ण जगात पसरलेल्या कोरोना सारख्या महामारीमुळे, राज्यामध्ये रक्ताचा भीषण तुटवडा निर्माण झाला आहे.आपण समाजाच्या काहीतरी ऋणी लागतो या भावनेतून व छ. संभाजी महाराज यांचे जयंतीनिमित्त हा रक्तदान शिबिर कार्यक्रम घेण्यात आला.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुर्टी गावातील तरुण युवकांनी एकत्र येऊन रक्तदान शिबिर घेतले.त्याबद्दल पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोद काकडे यांनी युवकांचे कौतुक केले.

बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी देखील कार्यक्रमाचे कौतुक करत समजुपयोगी कार्यक्रम घेतल्याबद्दल सर्वांना शुभेच्छा दिल्या.

प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते रक्तदात्या युवकास प्रमाणपत्र तसेच एक वर्षाकरिता मेडिक्लेम देण्यात आला.
मुक्ताई ब्लड बँक इंदापूर यांनी रक्तदान शिबिरात सहकार्य केले.

कार्यक्रमास संजयगांधी निराधार योजनेचे अध्यक्ष धनवान वद-देशमुख,तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडिया अध्यक्ष सुनिल बनसोडे, मा.युवक अध्यक्ष विक्रम भोसले, मा.सरपंच मोढवे हनुमंत बालगुडे, बारामती दूध संघाचे मा.व्हा.चेअरमन वैभव मोरे, मा.उपसरपंच बाळासाहेब जगदाळे, चेअरमन नानासाहेब जगदाळे पाटील, सतिश जगदाळे, मा.उपसरपंच तानाजी खोमणे, डॉ.ननावरे,नानासो गदादे, उपसरपंच निलेश मासाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित सर्व मान्यवर व रक्तदात्यांचे आभार पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडियाचे सरचिटणीस निलेश शेलार यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!