मुलभूत गरजा व योजनांसाठी एकता गृहनिर्माण संस्थेला सर्वतोपरी मदत करणार- ना.अजित पवार
अंतर्गत 83 रो-हाऊस व 17 नियोजित असलेल्या 100 रो-हाऊसचे भूमिपूजन

मुलभूत गरजा व योजनांसाठी एकता गृहनिर्माण संस्थेला सर्वतोपरी मदत करणार- ना.अजित पवार
अंतर्गत 83 रो-हाऊस व 17 नियोजित असलेल्या 100 रो-हाऊसचे भूमिपूजन
बारामती वार्तापत्र
एकता सहकारी गृहनिर्माण संस्थेला मुलभूत गरजा आणि योजनांसाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी केले.
एकता सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., बारामतीच्या अंतर्गत 83 रो-हाऊस व 17 नियोजित असलेल्या 100 रो-हाऊसचे भूमिपूजन समारंभ ना.पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, बाजार समितीचे सभापती सुनिल पवार, सचिव अरविंद जगताप, खरेदी विक्री संघाचे चेअरमन विक्रम भोसले, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, धनंजय जामदार, गृहनिर्माण संस्थेचे संचालक हाजी रशिद बागवान, आसिफ झारी, सौ.सलमा शेख, अकलाज सय्यद, रिजवान सय्यद, इम्रान मोमीन इ. मान्यवर उपस्थित होते.
पुढे ना.पवार म्हणाले की, बारामती वाढत आहे, मेडद सुद्धा बारामती नगरपरिषदेच्या हद्दीत येत आहे. पुढे आयुर्वेदिक महाविद्यालय काही दिवसात पूर्ण होणार असल्याने या रस्त्याला महत्व आलेले आहे. एकता गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून चांगली घरे याठिकाणी उभे राहणार आहेत.
एकता ग्रुपच्या माध्यमातून शाळा, पतसंस्थेने जशी भरारी घेतली आहे त्याचप्रमाणे हा प्रकल्प लवकरच पूर्ण होईल अशीही आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकता गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष आलताफ सय्यद यांनी केले. ते म्हणाले की, दोन वर्षात गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून घरे तयार करून ना.अजित पवार यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप करणार आहे. प्रत्येक कार्यात उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभत असते याही प्रकल्पाला बहुमूल्य सहकार्य लाभणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस प्रार्थना करून दादांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. दादांनी यावेळी बांधकामाचा आराखडा पाहुन त्यामध्ये भविष्याचा विचार करून काही बदल करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे परवेज सय्यद यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इम्तियाज तांबोळी यांनी केले. शेवटी आभार सुभान कुरैशी यांनी मानले. यावेळी बहुसंख्य मुस्लीम समाज व विशेषत: महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.