मुलीच्या वाढदिवसानिमित्त ऑक्सिजन सिलिंडर भेट
समाजात दानशुर व्यक्ती भरपुर आहेत फक्त पुढे येण्याची गरज आहे

मुलीच्या वाढदिवसानिमित्त ऑक्सिजन सिलिंडर भेट
समाजात दानशुर व्यक्ती भरपुर आहेत फक्त पुढे येण्याची गरज आहे
निमगांव केतकी ; बारामती वार्तापत्र
विजय पवार यांनी तरुण पिढीला केलेल्या आव्हानातुन आज समाजातुन गरजु रुग्णांकरीता मदतीचा हात पुढे येत आहे. यामध्ये व्याहाळी (तनपुरेवाडी) आप्पा तनपुरे यांनी आपली मुलगी ॠतुजा तनपुरे हिच्या तिस-या वाढदिवस निमित्त निमगांव केतकी येथील शासकीय रुग्णालयातील गरजु रुग्णांकरीता मदत म्हणून 10 ऑक्सिजन सिलिंडर देवुन आपल्या मुलीचा वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा केला. इंदापुरचे तहसीलदार अनिल ठोंबरे साहेब यावेळी उपस्थित होते. यावेळी निमगाव केतकी येथील ॲम्बुलन्स चालक गणेश घाडगे कोरोना काळात कोवीड रुग्णांकरीता अतिशय प्रामाणिकपणे अहोरात्र पणे कार्य केले. या कामाकरीता त्यांना तहसीलदार अनिल ठोंबरे साहेब यांच्या हस्ते कोविड योद्धा म्हणून सन्माननीत करण्यात आले. या पुढील काळात आपल्या कडुन समाजासाठी सेवा घडो तसेच फक्त ऑक्सिजन नाही तर वेगवेगळ्या माध्यमातून कोरोना रुग्णांकरीता मदतीचा हात पुढे यावा अशी भावना अनिल ठोंबरे यांनी व्यक्त केली. यावेळी व्याहळी ग्रामपंचायत सदस्य सुयोग पाटील, दामोदर पवार , सोमनाथ तनपुरे, नाना भोंग, डाॅ. अरविंद आरकिले, सागर पवार, गणेश शेळके, सोमनाथ भोंग, अक्षय तनपुरे, नितीन माने, अमित फलफले, शासकिय रुग्णालयातील परिचारिका चौधरी मॅडम, पाडवी मॅडम, कुंभार मॅडम, बागुल मॅडम, अडसुळ मॅडम, बगाडे मॅडम,पतंगे मॅडम उपस्थित होते
समाजात दानशुर व्यक्ती भरपुर आहेत फक्त पुढे येण्याची गरज आहे, रुग्णालयातील डाॅक्टर व सेविका उत्तम पद्धतीने कामकाज करीत करीत आहे त्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहे आपल्या तरुण पिढीने पुढे येवुन सर्व डाॅक्टर तसेच सेविका ऑर्डबाॅय यांना सहकार्य केले पाहीजे आप्पा तनपुरे यांचे अभिनंदन करुन आणखीन तरुणांनी पुढे येवुन कोरोनाच्या लढ्यात सहभागी होऊन मदतीचा हात पुढे करावा अशी विनंती विजय पवार सर यांनी केली.