मेडिकल ऑक्सिजन निर्मिती क्षेत्रातही वालचंदनगर कंपनीची भरारी
वालचंदनगर येथे मेडिकल ऑक्सिजन प्लांटच्या गाडीला हिरवा झेंडा दाखविताना मुख्य कार्यकारी अधिकारी चिराग दोशी, डॉ. राहुल हर्ष.

मेडिकल ऑक्सिजन निर्मिती क्षेत्रातही वालचंदनगर कंपनीची भरारी
वालचंदनगर येथे मेडिकल ऑक्सिजन प्लांटच्या गाडीला हिरवा झेंडा दाखविताना मुख्य कार्यकारी अधिकारी चिराग दोशी, डॉ. राहुल हर्ष.
बारामती वार्तापत्र
इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर कंपनीने मेडिकल ऑक्सिजनची निर्मिती केली आहे. यामुळे कोरोनाकाळातील ऑक्सिजन तुटवड्यावर काही प्रमाणात मार्ग निघाला आहे. कंपनीने तयार केलेले सात ऑक्सिजन प्लांट मंगळवारी (दि.७) नागालँड, झारखंड, त्रिपुरा व राजस्थानमध्ये पाठविण्यात आले.
कोरोनाकाळात देशभरात सर्वत्र ऑक्सिजनची कमतरता भासली होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला होता. याच पार्श्वभूमीवर शासनाने ऑक्सिजन प्लांटनिर्मितीसाठी देशातील औद्योगिक क्षेत्राला चालना दिली होती.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने वालचंदनगर कंपनीकडे ऑक्सिजन प्लांट तयार करण्याची जबाबदारी सोपवली होती. वालचंदनगर कंपनीने आपले वेगळेपण जोपासत अत्यंत कमी कालावधीत ऑक्सिजन प्लांटनिर्मिती करण्यात यश मिळविले. या प्लांटद्वारे
वातावरणातील हवा घेऊन त्यापासून ऑक्सिजन बनविण्यात येणार आहे. प्लांट तयार झाल्यानंतर त्याच्या सर्व चाचण्या घेऊन तयार झालेले प्लांट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चिराग दोशी, संरक्षण संशोधन आणि विकास
संस्थेच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे शास्त्रज्ञ डॉ. राहुल हर्ष यांच्या हस्ते ज्या-त्या राज्यांकडे पाठविण्यात आले आहे.
वालचंदनगर कंपनीने तयार केलेले ऑक्सिजन प्लांट नागलँड, झारखंड, त्रिपुरा, राजस्थान राज्यांना पीएम केअर्समधून देण्यात येणार
असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिराग दोशी यांनी सांगितले. या कार्यक्रमामध्ये ऑनलाइन पध्दतीने संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. टी. एम. कोत्रेश, संचालक पी. एम. कुरुलकर, डी. बी. पेद्राम सहभागी झाले होते. कंपनीचे जनरल मॅनेजर धीरज केसकर, नितीन पोळ या वेळी उपस्थित होते.