मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणावर बिबट्याचा हल्ला, वनविभागाकडून बिबट्याचा शोध सुरु
भाजी आटोळेंना ससून रुग्णालयात दाखल

मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणावर बिबट्याचा हल्ला, वनविभागाकडून बिबट्याचा शोध सुरु
भाजी आटोळेंना ससून रुग्णालयात दाखल
पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील हडपसरमध्ये पहाटे बिबट्याचं दर्शन झालं. यावेळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणावर या बिबट्याने हल्ला केला. हडपसर येथील गोसाई वस्ती, सिरम कंपनीमागे ही घटना घडली. संभाजी आटोळे असं या तरुणाचं नाव आहे ज्यावर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये तो जखमी झाला आहे.
संभाजी आटोळे हा गोसाई वस्ती, सिरम कंपनीमागे पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉककरिता गेला होता. तेवढ्यात तिथे एका बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये त्याच्या पायाला आणि गालाला बिबट्याचे पंजे लागले. त्यात कतो जखमी झाला. सध्या संभाजी आटोळेंना ससून रुग्णालयात दाखल केलं आहे. सध्या वनविभागाकडून बिबट्याचा शोध सुरु आहे.