मोठा दणका ;आमदार गणेश नाईक यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता,कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला,आता कधीही अटक होणार
नेरुळ पोलीस ठाण्यात कलम 376 अन्वये गुन्हा दाखल आहे
मोठा दणका ;आमदार गणेश नाईक यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता,कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला,आता कधीही अटक होणार
नेरुळ पोलीस ठाण्यात कलम 376 अन्वये गुन्हा दाखल आहे.
नवी मुंबई : प्रतिनिधी
भाजप आमदार गणेश नाईक यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. ठाणे सत्र न्यायालायनं गणेश नाईक यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. लैंगिक शोषण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दीपा चौहान नावाच्या महिलेनं गणेश नाईकांविरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानंतर गणेश नाईक यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.विशेष म्हणजे सेशन कोर्टाने याआधी 21 एप्रिलला देखील अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यावेळी 27 एप्रिलला सुनावणी होईल, असं जाहीर केलं होतं. अखेर सेशन कोर्टाने आज गणेश नाईक यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.
बेलापूर पोलीस ठाण्यात शस्त्र दाखवून धमकावणे आणि नेरुळ पोलिसात बलात्कार विरोधात पीडितेने तक्रार केली होती. या दोन्ही प्रकरणात गणेश नाईकांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. गणेश नाईक सारखी प्रतिष्ठित व्यक्ती या केस संदर्भात फिर्यादीवर दबाव टाकू शकते, या कारणाने ठाणे कोर्टाने दोन्ही गुन्ह्याप्रकरणी जामीन फेटाळला आहे. विशेष म्हणजे दोन्ही पोलीस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्यांनी गणेश नाईक यांच्या कस्टडीची मागणी केली होती. पोलिसांना बलात्कार प्रकरणात मेडिकल करायची होती. शस्त्र दाखवण्याच्या प्रकरणात हत्यार जप्त करण्यासाठी गणेश नाईक यांच्या कास्टडीची मागणी करण्यात आली होती.
नेमकं प्रकरण काय आहे ?
एका महिलेने गणेश नाईक यांच्यावर आरोप केले आहेत. महिलेने सांगितल्यानुसार, ते दोघे गेल्या 27 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. तसेच नाईक यांच्यापासून आपल्याला एक मुलगा झाला असून त्याचे वय पंधरा वर्ष आहे. नाईक यांनी त्या महिलेला ग्वाही दिली होती की, हा मुलगा पाच वर्षांचा झाल्यानंतर मुलाचा आणि त्याच्या आईचा आपण अधिकृतपणे स्वीकार करू. मात्र नंतर नाईक यांनी आपला शब्द पळाला नाही आणि त्या महिलेची फसवणूक केली. त्यानंतर नाईकांकडून फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने शारीरिक संबंध ठेवण्यास विरोध केला. मात्र, नाईक यांनी आपल्यावर जबरदस्ती करून वारंवार अत्याचार केला, अशी तक्रार पीडित महिलेने नेरुळ पोलीस ठाण्यात केली. यानंतर पोलिसांनी नाईक यांच्या विरोधात शनिवारी रात्री बलात्काराचा गुन्हा दाखल केला.